आशाताई बच्छाव
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मागे खंबीपरणे उभे राहावे
सरपंच संघटनेचे संजयभाऊ निखारे यांचे आवाहन
नवेगाव येथील लाडक्या बहिणींच्या मेळाव्याला लाडक्या बहिणींचा उत्तम प्रतिसाद
कोटगल बॅरेज, कोटगल उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून परिसर सुजलाम सुफलाम करण्याचा यशस्वी प्रयत्न करणारे पहिले आमदार
गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बहुतांश परिसर सिंचनासाठी भक्कम करणारे आमच्या कोटगल मुरखळा जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांची भूमी सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी कोटगल बॅरेज, कोटगल उपसा सिंचन योजना मंजूर करून पाईपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचविणारे आमदार डॉक्टर देवराव जी होळी हे पहिले आमदार असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी, नागरिकांनी ,माता भगिनींनी , लाडक्या बहिणीनी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन सरपंच संघटनेचे नेते पारडीचे सरपंच संजय भाऊ निखारे यांनी नवेगाव येथील लाडक्या बहिणींच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मंचावर आमदार डॉक्टर देवरावजी होळी, ज्येष्ठ नेते पंचायत समितीचे माजी सभापती मारोतरावजी ईचोडकर ,उपसभापती विलासजी दशमुखे,भाजपा ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी ,नवेगावचे सरपंच, उपसरपंच राजूभाऊ खंगार , वैद्यकीय सेलचे डॉक्टर अविनाशजी शंखरदरबार , शहराच्या अध्यक्षा कविताताई उरकुडे, यांचे सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय भाऊ निखारे म्हणाले की , कोटगल बॅरेज मागील अनेक वर्षांपासून मंजूर होते परंतु ते व्यपगत होण्याच्या परिस्थितीमध्ये आले होते. त्याची कालमर्यादा संपत आली होती . अशा परिस्थितीमध्ये त्याला प्रशासकीय मंजुरी न मिळाल्यास पुन्हा ते १०-२० वर्ष मागे जाणार म्हणुन आपल्याच सरकारच्या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन करण्याची भूमिका आमदार डॉक्टरदेवरावजी होळी यांनी घेतली . मंत्र्यांची भेट घेऊन त्याला किमान १ रुपया तरी अर्थसंकल्पात मंजूर करावा अशी मागणी करून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्यपालांकडे खास बाब म्हणून चर्चेची मागणी केली . अखेर राज्यपालांसोबत झालेल्या अनेक चर्चेच्या फलश्रुतीतून त्यांना यश मिळाले .यामुळे परिसरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होणार असून सिंचनासाठीही मोठी सोय निर्माण झाली आहे. सिंचना सोबतच वैद्यकीय महाविद्यालय, उद्योग प्रकल्प , रोजगाराच्या संधी मिळवून देण्यामध्ये यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठीशी परिसरातील सर्व नागरिक बंधू ,भगिनी ,लाडक्या बहिणी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.