Home नांदेड तात्‍पुरते फटाका परवानासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

तात्‍पुरते फटाका परवानासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

86
0

आशाताई बच्छाव

1000810943.jpg

तात्‍पुरते फटाका परवानासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 3 ऑक्टोबर : वर्षे-2024 मध्‍ये दिपावली उत्‍सव 28 ऑक्‍टोंबर ते 3 नोव्‍हेंबर 2024 या कालावधीत साजरा होत आहे. त्‍यानिमित्‍त नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना जि‍ल्‍हादंडाधिकारी हे निर्गमित करणार आहेत. जिल्‍हयातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांना त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरता फटाका परवाना निर्गमित करण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍यात आले आहेत. त्‍यानुषंगाने नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍यामार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार 4 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2024 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्‍याची अंतीम तारीख बुधवार 16 आक्‍टोंबर 2024 आहे.

तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यातील अर्ज पुढे नमुद कागदपत्रांसह आपल्‍या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावा. नमुना AE-5 मधील अर्ज. परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग, परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 84 अन्‍वये सदर दुकानातील एकमेकांपासून किमान अंतर 3 मीटर असावे तसेच संरक्षीत क्षेत्रापासूनचे अंतर 50 मीटर असणे आवश्‍यक आहे. सदर नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा तसेच सदर नकाशा स्‍थानिक प्राधिकरणा कडून साक्षांकित केलेला असावा.

अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो. लायसंन्‍स फीस सहाशे रूपये चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिकरित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड, मुख्‍याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र. जिल्‍हा व्‍यवसायकर अधिकारी,नांदेड या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र. महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळ,नांदेड या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र. विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, उद्योग, उर्जा व कामगार विभाग नांदेड यांचे नाहरकत प्रमाणपत्र. जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.

नोंदणीकृत, मान्‍यताप्राप्‍त असोसिएशन मार्फत तात्‍पूरता फटाका परवानासाठी अर्ज केल्‍यास या कार्यालया मार्फत देण्‍यात येणाऱ्या परवान्‍यातील नमूद अटी व शर्तीनूसार सबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल. तसेच कोणत्‍याही विस्‍फोटक नियमांचे व परवान्‍यातील अटी व शर्तीचे उल्‍लंघन होवून कोणताही अनूचित प्रकार घडल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी सबंधित असोसिएशनची असेल याबाबत सबंधित असोसिएशनकडील शपथपत्र, दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील अग्निशमन दल सुरक्षा रक्षक इत्यादी. इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार. संबधीत तहसिलदार यांचे नाहरकत प्रमाणपत्र शासन स्‍तरावरुन तसेच विस्‍फोटक नियंत्रक व इतर सबंधित विभागाकडून वेळोवेळी फटाका परवाना निर्गमनाबाबत प्राप्‍त होणाऱ्या अटी व शर्तीचे अधीन राहून तात्‍पुरता फटाका परवाना वितरीक केला जाईल.
अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्रांची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनद्वारे फिस शासन खाती जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, संबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने दिनांक 24 व 25 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍यामार्फत तसेच उ‍पविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या मार्फत निर्गमित केले जातील.

दिपावली सण-उत्‍सव कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिमाणा पर्यंतचाच व्‍यवहार करता येईल. याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-XV मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here