Home नांदेड राज्य शासनाच्या महिला विषयक धोरणांची मांडणी मेळाव्यातून व्हावी : जिल्हाधिकारी 7 ऑक्टोंबरच्या...

राज्य शासनाच्या महिला विषयक धोरणांची मांडणी मेळाव्यातून व्हावी : जिल्हाधिकारी 7 ऑक्टोंबरच्या नवा मोंढा येथील महिला मेळाव्यासाठी प्रशासनाची तयारी जिल्हा प्रशासनाकडून महिला सशक्तिकरण अभियानाचा आढावा

18
0

आशाताई बच्छाव

1000810938.jpg

राज्य शासनाच्या महिला विषयक धोरणांची मांडणी मेळाव्यातून व्हावी : जिल्हाधिकारी
7 ऑक्टोंबरच्या नवा मोंढा येथील महिला मेळाव्यासाठी प्रशासनाची तयारी
जिल्हा प्रशासनाकडून महिला सशक्तिकरण अभियानाचा आढावा
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 3 ऑक्टोबर : नवा मोंढा मैदानावर सात ऑक्टोबरला होणाऱ्या महिला सक्षमीकरणाच्या मेळाव्याची तयारी प्रशासन करत असून जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणा संदर्भात यशस्वी झालेल्या वेगवेगळ्या योजना व उपक्रमांची योग्य मांडणी करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा त्यांनी आज घेतला.

राज्य शासनाच्या पथदर्शी योजनातून मोठ्या प्रमाणात निधी सामान्य जनतेपर्यंत पोहोचला आहे.अनेक योजना, उपक्रमातून अनेकांना लाभ मिळाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणेमार्फत कृषी,महिला, युवक, कामगार, महिला बचत गट, शिक्षण महिला सक्षमीकरण आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे या सर्व निर्णयाचे प्रतिबिंब या मेळाव्यात दिसायला हवेत अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येणाऱ्या महिलांच्या प्रवासाची खाणपणाची आरोग्याची तसेच सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून ज्याला जे काम नेमून दिले ते जबाबदारी करण्याची सूचनाही त्यांनी या बैठकीत केली.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी कोल्हे, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

राज्य शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले असून या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांमधील लाभार्थ्यांची संवाद साधने व त्यांना प्रत्यक्ष या योजनाचा कार्यक्रमांमध्ये लाभ देणे सुरू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत कार्यक्रम झाले असून आता नांदेडमध्ये देखील ७ ऑक्टोबरला हा कार्यक्रम होणार आहे.

नवा मोंढा येथील मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमांमध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले असून शेकडो पैठणीचे वाटपही होणार आहे. महिलांसाठी वाहन व्यवस्था करण्यात आली असून यासंदर्भात यंत्रणेकडून महिलांशी संपर्क साधणे सुरू आहे.

Previous articleवृद्ध कलावंतांचे मानधन प्रकरणे तपासून निवड करा अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन
Next articleतात्‍पुरते फटाका परवानासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here