Home नांदेड मीनल करणवाल यांनी ISO नामांकन केल्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कौतुक.

मीनल करणवाल यांनी ISO नामांकन केल्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कौतुक.

41
0

आशाताई बच्छाव

1000801795.jpg

मीनल करणवाल यांनी ISO नामांकन केल्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कौतुक.

देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे

जिल्हा परिषद नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय हणेगाव येथे दप्तराची पाहणी करून येथील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. हणेगाव ग्रामपंचायत हे तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतला ISO नामांकन दर्जा देण्यात आला. कर्मचारी मागील अनेक महिन्यापासून अहोरात्र मेहनत केले ग्रामपंचायत अंतर्गत वर्ष प्रमाणे प्रसोडींग व 1 ते 33 नमुने एकत्रित करून प्रत्येक बस्ता बांधून त्यावर त्या बस्त्यात कोणत्या वर्षचे रेकॉर्ड आहे ते त्या बस्त्याच्या वर एक यादी चिटकावण्यात आले आहे. रेकॉर्ड तपासणी वेळेस ISO अनिल येवले यांनी रेकॉर्ड काढण्यासाठी 60 सेकंद चा टाईम देण्यात आले कर्मचारी सचिन भंडारे यांनी रेकॉर्ड एका वेळेस 60 सेकंदा पैकी 27 सेकंदात सण 1980 चा प्रोसिडींग व दुसऱ्या वेळेस 60 सेकंदात पैकी 17 सेकंदात मृत्यू रजिस्टर काढून दाखवले. मुख्य कार्यकारी मीनल करणवाल यांनी 25 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतला भेट देऊन ग्रामपंचायत कामकाज ची पाहणी करून कर्मचाऱ्यांचे कौतुक केले त्यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी सामान्यप्रशासन राजकुमार मुक्कावार साहेब, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे मॅडम पंचायत विभाग,शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड सविता बिरगे मॅडम, गट विकास अधिकारी देगलूर शेखर देशमुख साहेब, विस्तार अधिकारी पंचायत बालाजी उमाटे साहेब, ISO एडिटर अनिल लेवले व योगेश जोशी, ग्रामसेवक संघ जिल्हा अध्यक्ष व ISO मार्गदर्शन मधुकर मोरे सर सरपंच सौ शारदादेवी शंकरराव राठोड व उपसरपंच मुजीपोद्दीन चमकूडे व सर्व सदस्य व तसेच ग्रामपंचायत अधिकारी निखिल कोठारे, व कुठे सर उपस्थित होते, तसेच विस्तार अधिकारी पंचायत बालाजी उमाटे व ग्रामपंचायत अधिकारी अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी सचिन भंडारे माधव नामेवार रामदास बैलवाड अहमद अतार गणपत भंडारे नामदेव पवार प्रभाकर भंडारे अक्षय पवार अशोक टोके इरबा टोके देविदास सावरगावे कपिल तलारे रोहन भंडारे या सर्व कर्मचारी वर्गाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आय एस ओ मानांकन प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित केले. व ग्रामपंचायत कार्यालय हणेगाव येथे राबलेल्या या कामगिरीचे कौतुक करत अशाच प्रकारे हणेगाव पॅटर्न जिल्हात राबवणार असे मुख्य कार्यकारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here