आशाताई बच्छाव
कोचिंग क्लासेसमध्ये काय काय नाही घडत ? – कोचिंग क्लासेस मध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांनीवर अत्याचार प्रकरणी आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-जळगाव जामोद शहरातील एका कोचिंग क्लासेस शिकवणी मध्ये असणाऱ्या
विद्यार्थिनीवर तेथीलच शिक्षकाने अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षकावर जळगाव जामोद पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणातही कोचिंग क्लासेसची संख्या लक्षणिय असून, याबाबत यंत्रणेने करडी नजर ठेवून उपायोजना राबवणे आवश्यक आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद येथील 17 वर्षीय विद्यार्थिनी ही जलाराम मंदिराजवळ असणाऱ्या एका कोचिंग क्लासेस मध्ये शिकवणी साठी जात होती तेथील शिक्षक किशोर पाटील यांनी दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता च्या सुमारास विद्यार्थिनीला तुला काही प्रॉब्लेम आहे असे म्हणून फिर्यादीच्या अंगावरून वाईट
उद्देशाने हात फिरवला अशी तक्रार फिर्यादीने जळगाव जामोद पोलिसात दिनांक 26 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 74 सकलम 8 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहे. दरम्यान बुलढाणा शहरात देखील अनेक कोचिंग क्लासेस मध्ये विद्यार्थिनींची गैरसोय होत असून संभाव्य घटना टाळण्यासाठी यंत्रणेने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.