आशाताई बच्छाव
सत्ता येते, जाते सलोखा कायम राहीला पाहिजे….. बदल घडवणारे पाहिजे की बदला घेणारे हे युवक ठरवतील. ….. राहुल बोन्द्रे
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नसतो. दहा वर्ष मी आमदार होतो, माझ्या अगोदर पंधरा वर्षे सौ. रेखाताई खेडेकर याही आमदार होत्या, पुढच्या निवडणुकीमध्ये मी पुन्हा
आमदार होईल ! पण विरोध हा फक्त निवडणुकीपुरताच असला पाहिजे, कारण लोकप्रतिनिधी हा संपूर्ण मतदारसंघाचा असतो फक्त त्यांना मतदान केलेल्या लोकांचाच नसतो. सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले तर संपूर्ण विकास साधला जातो. पण लोकप्रतिनिधींनी जर फक्त बदला घेण्यासाठी राजकारण केले तर त्यामुळे हजारो लोकांची शांतता, कायदा व सुव्यवस्था सर्व धोकयात येते.
सगळ्यांना शांततापूर्ण जीवन हवे असते, आणि या शांततापूर्ण जीवनात विकास हवा असतो.” दहशत पेरणाऱ्या हिटलरलाही शेवटी आत्महत्या करावी लागली होती”. त्यामुळे दहशतीचे दिवस हे चारच
असतात आणि या देशात कुणाचीही दहशत लोक जास्त काळ सहन करत नाहीत. जिल्ह्यातील दहशतहसुद्धा निवडणुकीत आता लोकच संपवतील.
त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील युवक वर्गाला दहशत हवी? बदला हवा? की बदल हवा? हे युवकांनीच ठरवायचे आहे ! सत्तेचा आधार घेऊन, काही लोकांना हाताशी धरून आम्हाला बदनाम करण्याचा जो डाव मांडला जात आहे तो कळण्याइतपत जनता सुज्ञ आहे. त्यामुळे आता न्यायासाठी जनतेच्या दरबारात जाणार आहे. जनता योग्य निर्णय घेईल याची आम्हाला खात्री आहे. असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री राहुल बोन्द्रे युवा मराठा शी बोलतांना म्हणाले.