Home पुणे धक्कादायक ! इन्स्टाग्रामवरची ओळख पडली महागात; महाविद्यालयीन युवतीवर गोड बोलून चौघांकडून बलात्कार;...

धक्कादायक ! इन्स्टाग्रामवरची ओळख पडली महागात; महाविद्यालयीन युवतीवर गोड बोलून चौघांकडून बलात्कार; आरोपींमध्ये दोघे अल्पवयीन

107
0

आशाताई बच्छाव

1000786996.jpg

धक्कादायक ! इन्स्टाग्रामवरची ओळख पडली महागात; महाविद्यालयीन युवतीवर गोड बोलून चौघांकडून बलात्कार; आरोपींमध्ये दोघे अल्पवयीन
पुणे : ब्यूरो चीफ उमेश पाटील
राज्यात सद्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण गाजत असतानाच पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशाच एका घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. नगररस्त्यावरील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ‘इन्स्टाग्राम’वरुन ओळख झालेल्या चार वेगवेगळ्या मित्रांनी गोड बोलून या मुलीशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. या चौघांचा एकमेकांशी कुठलाही संबंध नाही. या घटना वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मित्रांसोबत घडलेल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या सर्व घटनांमुळे ही मुलगी नैराश्यामध्ये गेली होती. यासंदर्भात तिचे समुपदेशन सुरू होते. दरम्यान, महाविद्यालयात पोलिसांनी आयोजित केलेल्या ‘गुड टच, बँड टच’ जागृती उपक्रमात हा प्रकार समोर आला आहे.
कोरेगाव पार्क पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ओम आदेश घोलप (वय २०) आणि स्वप्निल विकास देवकर (वय स अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. तर, अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते. त्यांची बाल निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी एका महाविद्यालयात ‘गुड टच, बेंड टच’ संदर्भातील कार्यक्रमाला गेल्या होत्या, त्यावेळी एक तरुणी तणावाखाली होती. ती महाविद्यालयीत समुपदेशकाकडे गेली होती, स्वतःबद्दलची माहिती देत असतानाच तिने समुपदेशकाला स्वतःच्या मैत्रिणीबाबत देखील सांगितले. ती मुलगी सतत तणावाखाली असते, तसेच, तिच्याबाबत काहीतरी गैरप्रकार घडल्याचा संशय तिने व्यक्त केला. तिला अनेक मुलांचे फोन येत असल्याचेही तिने सांगितले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत समुपदेशकाने पिडीत मुलीला तिच्या आई वडीलांसह महाविद्यालयात बोलवून चर्चा केली. त्यावेळी पिडीत मुलीने तिने घडलेला सर्व प्रकार कथन केला. तिची ‘इंन्टाग्राम’वर वेगवेगळ्या चार मुलांशी ओळख झाली होती. त्यातून या मुलांनी गोड बोलून तिच्याशी वेळोवली शारिरिक संबंध प्रस्थापित केले. या घटना एप्रिल २०२४ ते सप्टेंबर या काळात वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. समुपदेशकाने ही माहिती महाविद्यालयाच्या विश्वस्तांना कळवली. विश्वस्तांनी ही माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना दिली. त्यानंतर पिडीत मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक आरोपी हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असून इतर अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. दोघे जण अल्पवयीन असून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एकमेकांशी संपर्क असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. हा प्रकार एप्रिल ते सप्टेबर दरम्यान घडलेला आहे, कोणत्याही पार्टीमध्ये झालेला नाही, पोलिसांनी घटनास्थळांचा सविस्तर पंचनामा केला. तपास पथकाच्या अधिकारी व कर्मचायांना वेगवेगळ्या आरोपींच्या शोधार्थ पाठविण्यात आले आहे, आरोपीना अटक करण्यात आली. पिडीत मुलगी, आरोपी व अल्पवयीन आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गुन्ह्यातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले आहे. तसेच, त्याचा डीव्हीआर जप्त केला. या गुन्ह्यातील पिडीत मुलगी, आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण देखील करण्यात येत आहे. या तपासाकरीता सायबर तज्ञांची मदत घेतली जात आहे.
-स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, परीमंडल दोन

Previous articleरायगडसाठी अभिमानाची बाब ; संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी सुनिल तटकरे यांची निवड
Next articleशेतकऱ्यांनी पेरणीनंतर व काढणीनंतरही सोयाबीनला आलेले मोड पासुन डोळ्यात अश्रू आले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here