आशाताई बच्छाव
पुणे, ब्युरो चीफ उमेश पाटील –सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरव या ठिकाणी आज आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेत इशप्रित कटारिया या विद्यार्थिनी सुवर्णपदक पटकावल्या बद्दल व पुणे युथ कप फुटबॉल २०२४ या स्पर्धेत वयोगट १७ वर्षाखालील मुले या खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तृतीय चॅम्पियनशिप मिळवल्याबद्दल शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी सेक्रेटरी राजेश मनाकांत,मुख्याध्यापिका सीमा कांबळे,प्रायमरी मुख्याध्यापिका माया बायस,समन्वयक वैशाली दिंडाळ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले पिंपळे गुरवचे सर्वांच्या मदतीला धावून जाणारे असे सामाजिक कार्यकर्ते आणि संजय गांधी निराधार योजना ( महाराष्ट्र शासन ) यांचे सदस्य संजय मराठे तसेच श्री.कृष्णा भांडाळकर ( सिनेट मेंबर एस पी यु ) प्रदीप रणदिवे बॉक्सिंग कोच,जितू कटारिया इत्यादी मान्यवरांच्या हस्ते या सर्व खेळाडूंचा भव्य असा सत्कार व त्यांचे कौतुक करण्यात आले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे म्हणाले की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जे यश प्राप्त केले आहे त्या यशावरच न थांबता असेच आणखीन जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय आणि देश पातळीवर आपल्या शाळेचे नावमानाने घेतील असा खेळ करून आणखीन पारितोषिक जिंकावे आणि आपल्या शाळेचे नाव प्रसिद्ध करावे खेळाबरोबर शिक्षणालाही तेवढेच महत्त्व द्यावे.