Home नांदेड मुक्रमाबाद येथील छत्रपती संभाजी विध्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश.

मुक्रमाबाद येथील छत्रपती संभाजी विध्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश.

42
0

आशाताई बच्छाव

1000765788.jpg

मुक्रमाबाद येथील छत्रपती संभाजी विध्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश.

मुखेड/नांदेड प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे

मुखेड येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाला घवघवीत यश मिळाले .यामध्ये १४ वर्ष वयोगटात कृष्णा मारोतीराव तरगुडे हा विध्यार्थी २०० मीटर धाऊन प्रथम क्रमांक पटकावला तर पार्थ गणेश देवके हा विध्यार्थी ४०० मीटर धाऊन द्वितीय क्रमांक पटकावला कु.अश्विनी अशोक सुनेवाड ही विद्यार्थीनी थाळीफेक मध्ये तृतीय क्रमांक पटकावली १७ वर्ष वयोगटातील अजय वसंत राठोड ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सर्वप्रथम पटकावला, लखन वामन राठोड १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला कु.स्नेहा बालाजी इरफळे हिने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावली अशा प्रकारे वरील सर्व विध्यार्थ्यांनी खेळांमध्ये यश मिळवून विद्यालयाचा बहुमान वाढवला.या यशाबद्दल परीसरातले सर्व गावातील पालक वर्ग व नागरीक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.व पुढील स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री गजानन पाटील, सचीव श्रीनिवास पाटील, शाळेचे मुख्याध्यापक भायेगावे सर, खंकरे सर,मार्गदर्शक काळे सर,प्रा कपाळे सर,जाधव संतोष सर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंद‌नाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here