आशाताई बच्छाव
चाळीसगाव येथे एकदंत महोत्सवात गरीब कुटुंबातील मुलीला इलेक्ट्रिक स्कूटर मिळाली बक्षीस….
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील-
भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाऊंडेशन, चाळीसगाव व आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून
“MH52 चाळीसगावचा एकदंत”
भव्य सांस्कृतिक महोत्सव २०२४ चा बक्षीस वितरण सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिग्नल पॉइंट, चाळीसगाव येथे गणेश विसर्जन दिवशी पार पडला यात सर्वसामान्य परिस्थितीतील कु. ज्ञानदा दुसे हिला पहिले बक्षीस इलेक्ट्रिक स्कूटर मिळाली.
तर उर्वरित महिलांना देखील बक्षीस मिळणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस दिल्यावर मंगेश दादांनी ज्ञानदाचे खास अभिनंदन केले व तिला स्कूटरच्या चाव्या सुपूर्द केल्या.
त्यांनी ज्ञानदाला स्कूटरवर बसवून तिला तिच्या घरी सोडलं. हा माणुसकीचा अनमोल प्रसंग साक्षात भगवान गणेशाच्या आशीर्वादासारखा वाटला.
गणेश विसर्जनाच्या उत्सवाच्या दिवशी चाळीसगावात एक अविस्मरणीय प्रसंग घडला, ज्याने संपूर्ण तालुक्यात हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण केले. आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या लकी ड्रॉ सोडतीत, अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतील कु. ज्ञानदा दुसे हिला इलेक्ट्रिक स्कूटर बक्षीस म्हणून मिळाली. ज्ञानदा ही एक अत्यंत मेहनती आणि साध्या कुटुंबातील मुलगी आहे, तिचे वडील भाजीपाला दुकानात मजुरी करतात. या पार्श्वभूमीवर मिळालेलं हे मोठं बक्षीस ज्ञानदासाठी स्वप्नवत ठरलं.
या प्रसंगाने आणखी एक खास भावनिक कडी जोडली. ज्ञानदाला भाऊ नसल्याने, तिने मंगेश दादांना आपला भाऊ मानलं आणि आपुलकीने त्यांचं घरी आदरातिथ्य केलं.
मंगेश दादा चव्हाण यांची ही माणुसकीची भावना त्यांना चाळीसगावातील जनतेच्या हृदयात एक खास स्थान देत आहे. त्यांच्या नेतृत्वाने समाजातील प्रत्येक वर्गाला, विशेषतः महिलांना एक सुरक्षित आणि आधार देणारा भाऊ मिळाला आहे.