आशाताई बच्छाव
परळी शहरातील अवजड वाहनाची वाहतूक टोकवाडी बायपास मार्गे व वैद्यनाथ मंदिर परिसरात फाटक बसवण्यासंदर्भात अँड. मनोज संकाये मित्र मंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार!
जिल्हाधिकारी साहेबांनी गांभीर्यपूर्वक दखल घेऊन प्रश्न मार्गी काढावा – अँड.मनोज संकाये
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड/परळी दि: १८ सप्टेंबर २०२४ परळी शहरातील अवजड वाहनांची वाहतूक टोकवाडी – जिरेवाडी येथील बायपास मार्गे करावी तसेच वैद्यनाथ मंदिर परिसरात कायमस्वरूपी लोखंडी फाटक बसवण्याचे काम त्वरित सुरू करण्यासंदर्भात बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून मित्र मंडळाच्यावतीने निवेदन देणार असून जिल्हाधिकारी साहेबांनी यामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष घालून कामास गती द्यावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या महिन्याभरापूर्वी यासंदर्भात परळी पोलीस स्टेशनचे पी आय आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. निवेदन सादर करताना मित्र मंडळाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मात्र निवेदनाचा कसल्याही प्रकारचा विचार केला नाही. त्यामुळे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्यक्ष भेटून यावर चर्चा करून निवेदन मित्र मंडळाच्या वतीने सादर केले जाणार आहे. मंदिर परिसरातील दक्षिणमुखी गणेश मंदिराजवळ व नगरपालिका समोर फाटकसाठी मोठे खड्डे खोदले आहेत. जवळपास आठ दिवसापूर्वी खड्डे तयार करण्यात आले आहेत. मात्र त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. खड्डे मोठे असल्याने त्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पडण्याचा धोका संभवत आहे त्यामुळे परळीकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न संदर्भात माननीय जिल्हाधिकारी सकारात्मकता दाखवावी अशी अपेक्षा त्यांनी त्यांच्याकडून केली आहे.