Home जळगाव 187 जिल्हा परिषद शाळांसाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेअंतर्गत 176 उमेदवारांना प्रशिक्षण...

187 जिल्हा परिषद शाळांसाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेअंतर्गत 176 उमेदवारांना प्रशिक्षण आदेश

36
0

आशाताई बच्छाव

1000753436.jpg

187 जिल्हा परिषद शाळांसाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेअंतर्गत 176 उमेदवारांना प्रशिक्षण आदेश
—————
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजने अंतर्गत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते 176 उमेदवारांना जिल्हा परीषद शाळांमध्ये प्रशिक्षण घेणे बाबत आदेश दिले गेले.
महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही 9 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यांमध्ये लागू केली.वय वर्ष 18 ते 35 या वयोगटातील बारावी पास, आयटीआय,पदविका,पदवी, पदव्युत्तर शिक्षण झालेली व महाराष्ट्र राज्याची रहिवासी असलेल्या उमेदवार या योजनेत सहभागी झालेले आहेत
शिक्षण विभाग पंचायत समिती चाळीसगाव अंतर्गत 187 जिल्हा परिषद शाळांसाठी 176 उमेदवारांची निवड केलेली आहे.प्राधान्याने बी एड, डीएड,पदविकाधारक अशा क्रमाने मेरिटनुसार ही उमेदवार सिलेक्ट केलेले आहेत. 187 जागांसाठी तब्बल 300 अर्ज आलेले होते. 06 महिन्याचा हा प्रशिक्षण कार्यक्रम असून याचा लाभ प्रत्येक पात्र उमेदवाराला मिळणार आहे.
आपल्या समाजात शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे.
हा प्रशिक्षण कालावधी जरी असला तरी आपण शिक्षक म्हणून फक्त एका वर्गाचे शिक्षक नसून, आपण संपूर्ण समाजाचे शिल्पकार रहाणार आहात. हि नियुक्ती जरी 6 महिन्याची असली तर याचा उपयोग आपली कौशल्य विकसित करताना नक्कीच होवू शकेल असे मनोगत आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
प्रशिक्षण आदेश देणे प्रसंगीच्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गटशिक्षणाधिकारी विलास भोई हे उपस्थित होते.

Previous articleगणेशपूर येथील मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत..
Next articleचाळीसगावात गणेश विसर्जनाचे नगर परिषदेकडून ठिकाणे निश्चित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here