आशाताई बच्छाव
गणेशपूर येथील मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत..
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- दि.१४ सप्टेंबर रोजी गणेशपूर येथील रिंकेश नंदू मोरे या १३ वर्षीय तरुणाचा बिबट्याचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या तसेच मयताच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य देण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या.
आज दि.१६ सप्टेंबर रोजी मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. शासनाच्या वतीने २५ लाखांची मदत मंजूर झाली असून त्यापैकी १० लाखांच्या मदतीचा धनादेश मोरे कुटुंबियांकडे सुपूर्द केला. यावेळी वनविभागाचे अधिकारी, गावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
स्व.रिंकेश च्या दुर्दैवी निधनामुळे मोरे कुटुंबियांचे झालेले नुकसान न भरून निघणारे असले तरी शासन – प्रशासनातील दुवा या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून मोरे कुटुंबियांना आधार देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.