Home विदर्भ हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील मुलीची छेड काढल्याप्रकरणी वसमत शहर पोलीस स्टेशनच्या समोर...

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील मुलीची छेड काढल्याप्रकरणी वसमत शहर पोलीस स्टेशनच्या समोर शहरातील नागरिकाकडून ठिय्या आंदोलन

32
0

आशाताई बच्छाव

1000753354.jpg

हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील मुलीची छेड काढल्याप्रकरणी वसमत शहर पोलीस स्टेशनच्या समोर शहरातील नागरिकाकडून ठिय्या आंदोलन काल सायंकाळी वसमत शहर पोलीस स्टेशनच्या समोर करण्यात आले यामध्ये शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक शहर पोलीस स्टेशन समोर बसून चौकामध्ये आंदोलन करत असल्याचे पाहायला मिळाले शहरातील मुलीची काही परजातीय मुलाकडून शेड काढल्याची माहिती समोर आल्यानंतर सदरील मुलीने वसमत शहर पोलीस स्टेशन मध्ये फ्रीयाद दिली होती . त्यावरून वसमत शहर पोलीस स्टेशन गुन्ह्याची नोंद करून तात्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी वसमत शहरातील शेअर पोलीस स्टेशन समोर नागरिकांतून करण्यात आली यामध्ये शहरातील असंख्य नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते गिरगाव येथील ग्रुरूपादैश्वर महाराज यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक जमल्याने शहरातील मुख्य रस्ता जाम झाला होता पोलीस प्रशासनाने सदरील बाबीची माहिती जमलेल्या सर्व नागरिकासमोर सांगितल्यानंतर व आरोपी अटक दिल्याचे माहिती दिल्यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणी समूह ठिय्या आंदोलन बंद केले
दिवसेंदिवस शहरातील परिस्थिती गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याचे यापूर्वी वर्तमानपत्रे व न्यूज चैनल मधून अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध झाल्या तरीपण पोलीस प्रशासन सदरील बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज जो प्रकार नको व्हायला होता तोच प्रकार समोर आला व शहरातील मुलीची छेड काढली प्रकरणी लोकांना पोलीस स्टेशनच्या समोर येऊन ही ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here