Home बुलढाणा EXCLUSIVE – आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा ! -बुलढाणा विधानसभा मतदारसंघात...

EXCLUSIVE – आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा ! -बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही नसून गुंडशाही ! – काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके आणखी काय म्हणाल्या?

18
0

आशाताई बच्छाव

1000753261.jpg

EXCLUSIVE – आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा ! -बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही नसून गुंडशाही ! – काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके आणखी काय म्हणाल्या?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा ‘काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखांचे बक्षीस देऊ, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना
आमदार संजय गायकवाड यांनी आज एका पत्रपरिषदेत केले आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभर पडसाद उमटत असून बुलढाणा येथील काँग्रेसच्या प्रदेश सचिव अॅड. जयश्रीताई शेळके यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हा चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचा प्रकार असल्याचे म्हणत आमदार गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही नसून गुंडशाही असल्याचे दाखवून दिल्याची प्रतिक्रिया जयश्री शेळके यांनी ‘ युवा मराठा ‘शी बोलताना दिली.
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत
संविधान धोक्यात आहे, आरक्षण संपविण्याचा घाट घातल्या जात असल्याचे विधान केले जात असल्याने आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधीवर संधान साधत ‘राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखांचे बक्षीस जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान याचे देशभरातून पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. गायकवाड यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी आपली सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, चोराच्या उलट्या बोंबा असा हा प्रकार असून भाजपा व त्यांचे सहकारी पक्ष आरक्षण, लोकशाही, संविधान संदर्भात वारंवार चुकीचे विधान करीत असून या विरोधातच
राहिले आहे. लॅटरल एन्ट्री च्या माध्यमातून आयएस अधिकाऱ्यांच्याभाजप आणि नेमणुका केल्या हे देशात सर्वश्रुत आहे. त्याबरोबरच आमदार गायकवाड यांची दलित बांधवांच्या संदर्भातील आता पर्यंत काय वक्तव्य राहिली आहेत ? हे देखील सर्वश्रुत आहे. मुळात राहुल गांधी अमेरिकेत ज्या पद्धतीने बोलले त्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. राहुल गांधी देशातील मागास, दलित, आदिवासी, ओबीसीं समाज बांधवांना समान न्याय व अधिकार जोपर्यंत मिळत नाही आणि आर्थिक दृष्ट्या समानता जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत देशात आरक्षण सुरू राहील असे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांची भूमिका आरक्षणाच्या बाजूनेच राहिली आहे. जातीय जनगणनेची त्यांनी वारंवार मागणी केली
आहे. काँग्रेसने यापूर्वी जाहीर केले आहे की सत्तेत आल्यावर जातीय जनगणना केली जाईल. जातीच्या व लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण लागू केलं जाईल. आरक्षण वाढविला जाईल अशी भूमिका काँग्रेसकडून वारंवार जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान पुढे त्या म्हणाल्या की, ज्याची बुद्धीची पातळी जशी आहे तसे त्याला कळते. आमदार संजय गायकवाड यांचे चितावणीखोर वक्तव्य नवीन नाही. ते असे वक्तव्य करण्यात माहीर आहेत. त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही नसून गुंडशाही असल्याचे त्यांनी स्वतःच अशी विधाने करून दाखवून दिले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ही मागणी शेळके यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here