Home बुलढाणा भुमराळ्यात एक लाखांची घरफोडी ! – कुटुंबाला घरातील खोलीत कोंडून केली चोरी!

भुमराळ्यात एक लाखांची घरफोडी ! – कुटुंबाला घरातील खोलीत कोंडून केली चोरी!

14
0

आशाताई बच्छाव

1000753248.jpg

भुमराळ्यात एक लाखांची घरफोडी ! – कुटुंबाला घरातील खोलीत कोंडून केली चोरी!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा ग्राम भुमराळा येथील आरोग्य सेवक नारायण गोविंदराव सानप
यांच्या घरी 13 सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घर फोडुन अंदाजे 115000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने गावकरी भयभीत झाले आहे. विशेष म्हणजे अज्ञात चोरट्यांनी कुटुंबीयांना घराच्या खोलीत कोंडून ठेवून ही चोरी केली.

बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भुमराळा येथे 13 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 दरम्यान नारायण गोविंदराव सानप हे परीवारासह जेवण करून झोपले असता रात्री 1.30 वाजेच्या दरम्यान सानप यांना घरात मागील दरवाजा कापल्या जात असल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांना जाग आली व ते जागी होऊन समोरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर घराचे सर्व दरवाजे बाहेरुन लावलेले होते. अशा वेळी सानप
यांनी मोबाईल पाहीला असता तो दिसला नाही म्हणून घरातुनच आरडा ओरड करुन शेजारील लोकांना आवाज दिले आवाज ऐकताच शेजारी जागी झाले व त्यांनी दरवाजे उघडुन सानप व त्याच्या परीवाराला बाहेर आणले तोवर चोरट्यांनी घरातील ऐवजावर हात साफ करून पोबारा केला होता. सदर चोरट्यांनी घराच्या चॅनल गेट चे कुलुप तोडून जिण्या खालच्या दरवाज्याला होल पाडून कडी उघडुन घरात प्रवेश केला होता. सानप यांनी घरातील वस्तुची पाहणी केली असता बेडरुम मधील लोखंडी कपाटातुन 5 ग्रॅम सोन्याची अंगठी अंदाजे 25000 रु, 5. ग्रॅम सोन्याचे झुंबर अंदाजे 25000 रु,4. ग्रॅम सोन्याचे गहु मणी 37 नग अंदाजे 20000 रु, लटकवेलेली पॅन्ट मधील
नगदी रोख 10000 रु, बचत गटाचे ठेवलेले 5000 रु, कपाटातले नगदी पाच-पाचशे च्या 60 नोटा 30000 रु, मोटार साईकल, कार ची चाबी व मुळ कागद पत्रे असे एकूण अंदाजे 115000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या घटनेची माहीती देवानंद सानप यांनी बिबी पोलीस तात्काळ दिली असता घटनास्थळी पोलीस पोहोचले. घटनेची शहानिशा करून तात्काळ श्वानपथक व ठसेतज्ञ बोलावून नमुने घेण्यात आले. नारायण सानप यांनी बीबी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून पोलीसांनी अप नं 13/2024 कलम 331(4),305 भारतीय न्याय संहीता 2023 नुसार गुन्हा दाखल
करून घटनेचा पंचनामा केला. पूढील तपास ठाणेदार
संदिप पाटील, सफो परमेश्वर शिंदे, पोहेकों अशोक अंभोरे, मापोको नितीन मापारी, नापोका अरुण सानप पोका यशवंत जैवळ पोकों रविंद्र बोरे पोका भारत ढाकणे हे करीत आहे.

• भुमराळा आणी चोरी हे समीकरणच ! भुमराळा हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले असून गावाच्या आजू बाजूला वनविभागाचे जंगल आहे. हे गाव मराठवाड्याच्या सिमेलगत असल्याने या गावात अशाच प्रकारची घरफोडी चोरटे करतात भुमराळा आणी चोरी हे समीकरण च झाले आहे. आता पोलीस या चोरीच्या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहतात याकडे सर्वांचे लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here