Home भंडारा शिवनाळा चौ. येथील प्रकार : साहेब घर देता का घर..! ■ घरकूल...

शिवनाळा चौ. येथील प्रकार : साहेब घर देता का घर..! ■ घरकूल योजनेच्या लाभांपासून लाभार्थी वंचीत

248
0

आशाताई बच्छाव

1000746580.jpg

शिवनाळा चौ. येथील प्रकार : साहेब घर देता का घर..! ■ घरकूल योजनेच्या लाभांपासून लाभार्थी वंचीत

घराला आले तलावाचे स्वरूप

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)पवनी तालुक्यातील शिवनाळा येथील रहिवासी मागील अनेक वर्षापासून घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत आहे परंतु अजून त्याला घर देण्यात आलेले नाही. त्यामुळे रुखना तुकाराम ढंगरे घर देता का घर याकरिता ग्रामपंचायतला लोटांगण घालत आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे.सतत दोन तीन दिवसांपासून संपूर्ण
भंडारा जिल्ह्याला पावसाने झोडपले असून तालुक्यातील अनेक महामार्ग बंद पडले असून अनेकांचे राहायचे घर पावसात खचले तर काहींच्या घरात पाणीच पाणी चहूकडे साचले होते. पवनी तालुक्यातील रुखना तुकाराम ढंगरे रा. शिवनाळा चौ. येथिल रहिवासी असून मला २४ वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकूल योजनेपासून वंचीत ठेवले आहे. तरी मी वारंवार ग्रामपंचायत शिवनाळा येथे अर्ज केलेले आहेत. घरात विजेच्याकरंट दोन ते तीन वेळा लागलेला आहे आणि माझे घर कच्चे विटा मातीची असून घरात राहता येत नाही आणि पडण्याच्च्या स्थरावर आहे व माझे घर केव्हाही पडू शकते व जीवितहानी होण्याची शक्यता असते व माझे नाव प्रधानमंत्री योजनेच्या १३व्या क्रमांकावर आहे. तरीपण मला घरकूल योजनेत नंबर लागत नाही. कारण ग्रामपंचायत आपल्या मर्जीतील व्यक्तीना घरकूल लाभ देण्यात येतो आणि लाभार्थ्यांचे पक्के घर असूनही त्यांनापण घरकूल योजनेचा लाभ मिळत असतो. मग आपल्याला काय सांगत असता की शिवनाळा ग्रामपंचायत कर्मचारी या वर्षी घरकूलचा कोटा कमी आलेला आहे. मग सांगतात
की घरकुलाचा लाभ हा प्राधान्य क्रमाने देण्यात असतो.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन २०२१- २२ला ग्रामपंचायत शिवनाळा अंतर्गत इतर प्रर्गाचे २चे उदद्दिष्टे प्राप्त झाले असल्याने आपले नाव मंजुरीकरिता सादर केलेले नाही. आपणास याद्वारे असे कळविण्यात येत आहे की इतर प्रवर्गाचे प्राप्त उद्दिष्टांनुसार प्राधान्यक्रमानुसार नावे मंजुरीकरिता सादर करण्यात येतील. असे दरवर्षी कारणे देत असतात शिवनाळा ग्रामपंचायत कर्मचारीच्या मागे न लागता मी आपले सरकार मध्ये कंप्लेंट दर्ज दि. १ एप्रिल २०२४ रोजी केल्यानंतर २ ते ३ महिन्यानंतर आमच्या घरापर्यत ग्रामपंचायतील कर्मचारी आले आणि घराचे व लाभार्थ्यांची फोटो काढून नेल्यानंतर ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांनी घरकूल मिळणार कि नाही म्हणून सूचना पण दिल्या नाही. मग तरीपण लाभार्थी खचून न जाता पंचाय समिती पवनीला धाव घेतली. तिथेपण वारंवार अर्ज केले. तरीपण घरकुलचा पाठपुरवठा झालेला नाही. मग तरीपण जिल्हाधिकारी भंडारा, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद भंडारा, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा यांच्या कार्यालयना अर्ज केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here