Home बुलढाणा मुलगा होत नाही व माहेरचे हुंडा देत नाहीत” म्हणून सासरचे नरबळी देण्यासाठी...

मुलगा होत नाही व माहेरचे हुंडा देत नाहीत” म्हणून सासरचे नरबळी देण्यासाठी जादुटोणा करत सुनेचा करत होते छळ.

14
0

आशाताई बच्छाव

1000746302.jpg

मुलगा होत नाही व माहेरचे हुंडा देत नाहीत” म्हणून सासरचे नरबळी देण्यासाठी जादुटोणा करत सुनेचा करत होते छळ.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा:- बुलढाणा तालुक्यातील धाड येथील घटना मुलगा होत नाही व माहेरचे हुंडा देत नाहीत म्हणून सासरचे छळ करीत असल्याची खळबळजनक समोर आली सविस्तर वृत्त असे की महालक्ष्मी आगमनाच्या पुर्वसंध्येला घरातील एका लक्ष्मी सोबत छळ केल्याची घटना घडली.तु आम्हाला मुलं देऊ शकत नाहीस आणि तुझ्या घरचे हुंडा देऊन शकत नाहीस मग तुझा उपयोग आम्ही नरबळी साठी घेऊ असे म्हणत सुनेच्या अंथरूणाखाली लिंबु व ईतर जादुटोणा करण्याचे साहित्य ठेवण्यात आले होते.
मारझोड करणे,पाणी तापवायला वापरले जाणऱ्या शेंडीला करंट लावणे, असा त्रास घरचे देणं होते.ईतकेच काय तर पतीने तीन वेळा तलाक म्हणत सोडचिठ्ठी सुध्दा दिली.या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीसांत घरच्या विरोधात सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देऊळगाव राजा येथील रहिवासी मोहंमद जाकीर मोहंमद कौसर यांची मुलगी अल्फीया अनम (२४) हिचा विवाह बुलढाणा तालुक्यातील धाड येथील मोहंमद शहबाज मोहंमद इकबाल याच्यासोबत झाले
तो ठेकेदारीचा व्यवसाय करतो. मे २०२१ ते १० जून २०२४ या कालावधीत अल्फीयाचा हुंड्याच्या पैशांसाठी छळ करण्यात आला. तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा कमी दिला व तु आम्हाला वंशाचा दिवा सुध्दा देवु शकत नाहीस त्यामुळे तुझा बळी जादूटोण्यासाठी उपयोगात आणू, असे धमकावत तिच्या बिछाण्याजवळ लिंबू व अन्य अघोरी प्रथेचे साहित्य ठेवले जात होते.
या प्रकारामुळे ती पार धास्तावली होती. शेगडीवर पाणी तापविण्यास ठेवल्यानंतर त्या पाण्यात सासरचे लोक करंट सोडायचे. शिवीगाळ करून मारहाण करायचे. विवाहितेचा पती शहबाज हा तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील व्हिडीओ दाखवून तिचे मानसिक खच्चीकरण करायचा, असे विवाहितेने तक्रारीत नमूद केले आहे.
पोलिसांनी पती मोहंमद शहबाज याच्यासह सासरा मोहंमद इकबाल मोहंमद यासीन, सासू शबानाबी मोहंमद इकबाल, दीर मोहंमद शाहादात मोहंमद इकबाल, जाऊ सलमा परवीन मोहंमद शाहदाब, नणंद सबा अज्जूम मोहंमद अतिक (रा. धाड) व रमीजा परवीन अक्रम खान (गैबीपुरा, रिसोड, जि. वाशीम) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.

Previous articleचक्क..जिल्हा परिषद शाळेलाच ठोकले कुलूप ; एकही शिक्षक नसल्याने उचलले हे पाऊल !
Next articleमुलगा होत नाही व माहेरचे हुंडा देत नाहीत” म्हणून सासरचे नरबळी देण्यासाठी जादुटोणा करत सुनेचा करत होते छळ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here