आशाताई बच्छाव
नाशिक व पाचोर्याच्या चोरट्यांकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- दुचाकी चोरी प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी शोध घेतला असता दोन दुचाकी चोर हाती लागले. त्यांच्याकडून चाळीसगाव परिसरात चोरी केलेल्या सुमारे 3 लाख 52 हजार रूपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आले आहे. त्यातील एक चोर नाशिकचा तर दुसरा चाळीसगाव येथील असून चोरटे हे रेकॉडवरील गुन्हेगार असल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी दिली.
डोणदिगर ता. चाळीसगाव येथील दिनेश अर्जुन शिंदे यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी चोरीस गेल्याची घटना 15 जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरीबाबत काहीएक मागमूस नसतांना ग्रामीण पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरातून रोहीत आनंद म्हसदे(30) रा. लेंडाणे ता.मालेगाव ह.मु. अवधूतरोड, दिंडोरी रोड, पंचवटी नाशिक व सलमान बशिर पठाण (22) रा. वरखेडी ता. पाचोरा हमु. जहागिरदारवाडी, चाळीसगाव यांना संशयावरून ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यात आणून त्यंाची विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना 8 सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस रिमांड घेतला. या दरम्यान पोलीसांनी दोघांकडून 3 लाख 52 हजार रूपये किंमतीच्या 6 दुचाकी हस्तगत केल्या. या आरोपीतांनी या दुचाकी चाळीसगाव शहर परिसरातून चोरी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यातील दोन दुचाकींबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अटक केलेेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरूद्ध नाशिक शहरातील पंचवटी व अंबड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूलकुमार पवार,हवालदार प्रवीण सपकाळे, गोवर्धन बोरसे,संदीप पाटील, शांताराम पवार, पोकॉ.मनोज चव्हाण. पंकज निकम, सुनील पाटील, चेतन राजपूत यांच्या पथकाने केली. पुढील तपास हवालदार प्रवीण सपकाळे करीत आहेत.