Home गडचिरोली खाण समर्थक आत्रामांच्या विरोधात ग्रामसभांचा उमेदवार उभा करणार शेकापच्या आदिवासी, भटके –...

खाण समर्थक आत्रामांच्या विरोधात ग्रामसभांचा उमेदवार उभा करणार शेकापच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते

30
0

आशाताई बच्छाव

1000735755.jpg

 

खाण समर्थक आत्रामांच्या विरोधात ग्रामसभांचा उमेदवार उभा करणार

शेकापच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते

आलापल्ली/गडचिरोली ,सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: अहेरी चे आजी – माजी आमदार आणि नव्याने इच्छुक सर्व आत्राम हे बेकायदेशीर आणि बळजबरीने खोदण्यात येणाऱ्या लोह खाणींचे समर्थक आहेत. मंजूर आणि प्रास्तावित खाणींमुळे संपूर्ण दक्षिण गडचिरोली उध्वस्त होणार असतांना या विरोधात कोणीही बोलायला तयार नाहीत. उलट खाणींचे समर्थन करुन कोट्यवधी कमावण्यासाठी बाप – मुलगी – पुतण्या मध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. कोणताही आत्राम निवडूण आला तरी या क्षेत्राचा उध्दार होणार नसल्याने पिढ्यानपिठ्या पासूनचे नैसर्गिक संसाधने वाचविण्यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रात खाण विरोधी आंदोलनाच्या वतीने ग्रामसभांचा उमेदवार उभा करण्यात येणार असल्याचे खदान विरोधी कार्यकर्ते तथा शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी जाहीर केले.

आलापल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाई रामदास जराते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामसभा आपले नैसर्गिक संसाधने, संस्कृती आणि अस्तीत्व वाचविण्यासाठी विनाशकारी लोह खाणींना विरोध करीत आहेत. मात्र खाणींतून मिळणाऱ्या मलाईपोटी स्थानिकांचा आवाज दडपून टाकण्यात येत आहे. आपल्याला काॅंग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडी न्याय देईल या भावनेने खदान विरोधी ग्रामसभांनी यापूर्वी मतदान केले. मात्र जनतेचा भ्रमनिरास झाला.आता येणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अहेरीतील आत्राम परिवारात केवळ नवीन येणाऱ्या खाणींतून मलाई लाटण्यासाठीच्या हव्यासातून बंड होत आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीतील पक्षाने आत्राम परिवारातील खदान समर्थक व्यक्तीला संभाव्य उमेदवारी देणे हे अनेक वर्षांपासूनचा खदान विरोधी संघर्ष दडपून टाकण्यासारखे आहे, अशी टिका भाई रामदास जराते यांनी केली आहे.

त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून लढणाऱ्या तीनही आत्रामांविरोधात खदान विरोधी कार्यकर्त्याला उमेदवार म्हणून उभा करण्यात येणार आहे. तसेच उमेदवार कोण असेल याबाबत भाजप, काॅग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना वगळता खदानविरोधी राजकीय पक्ष, संगठना, पारंपारीक ईलाके, ग्रामसभांच्या कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही यावेळी भाई रामदास जराते यांनी दिली.

पत्रकार परिषदेला सुरजागड पारंपारिक ईलाका गोटूल समितीचे प्रमुख व माजी जि.प.सदस्य सैनू गोटा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव काॅ. सचिन मोतकुरवार, स्टुडन्ट फेडरेशन चे जिल्हा संयोजक काॅ. सुरज जक्कुलवार, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, अक्षय कोसनकर, ग्रामसभेचे कार्यकर्ते मंगेश नरोटे, सुशिला नरोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleपरळीतील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणींची पिळवणूक!
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन कार्यकारिणी साठी शनिवारी बैठकीचे आयोजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here