Home बीड परळीतील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणींची पिळवणूक!

परळीतील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणींची पिळवणूक!

41
0

आशाताई बच्छाव

1000735743.jpg

परळीतील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणींची पिळवणूक!

मोहन चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी बीड

बीड/परळी  : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणींची पिळवणूक होत असून परळी वैजनाथ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया जाणीवपूर्वक महिलांच्या के.वाय.सी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे मत महिलांमधून व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाकडी बहिण योजनेचे अर्ज भरलेल्या महिलांची परळी वैजनाथ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेने धोबी का कुत्ता गली का ना घाट का अशी अवस्था करून ठेवली आहे. ऑगस्ट महिन्यापासून परळी वैजनाथ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेने लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरलेल्या महिलांचे के. वाय.सी. करणे बंद केले असून २८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ०७ वाजल्यापासून अन्न पाणी न घेता ऊन पाऊस न पाहता दिवसभर लाईनमध्ये उभे टाकून के.वाय.सी. करण्यासाठी थांबलेल्या महिलांचे फॉर्म आम्ही के.वाय.सी. करून घेऊ असे सांगत परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक शाखा व मोंढा मार्केट शाखा येथील कर्मचारी आणि अधिकारी यांनी फॉर्म जमा करून घेतले मात्र अद्याप या महिलांची के. वाय. सी. स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेने केलेली नाही १०० रुपये खर्च करून ग्राहक सेवा केंद्रावरून भरलेल्या फॉर्मला स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली असल्याचे मत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी मधून येत आहे‌. तरी मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडून महिलांना होत असलेला त्रास आणि पिळवणूक थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे परळी वैजनाथ शहरातील आणि ग्रामीण भागातील महिलांचे मत येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here