Home वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे पोक्सो कायद्यावर पथनाट्य

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे पोक्सो कायद्यावर पथनाट्य

70
0

आशाताई बच्छाव

1000735726.jpg

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे पोक्सो कायद्यावर पथनाट्य

वाशिम/गोपाल तिवारी ब्यूरो चीफ

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण च्या आदेशान्वये वाशीम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने गणेशोत्सव दरम्यान विविध गणेश मंडळासमोर “पोक्सो कायद्याच्या” जनजागृती करीता पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.”पोक्सो कायदा” काय आहे त्याची माहिती जनतेला होऊन त्याची योग्य ती अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने सदर पथनाट्य विविध ठिकाणी सादर केले जात आहे. या पथनाट्याची सुरुवात दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता संत निरंकारी भवन येथून करण्यात आली त्याच दिवशी संध्याकाळी 8 वाजता पाटणी चौकातील नवभारत गणेशोत्सव मंडळ येथे तर दिनांक 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजता स्थानिक मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळासमोर तर 10 सप्टेंबर रोजी श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ समोर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.आतापर्यंत सदर पथनाट्याचे 4 प्रयोग झाले मुख्य लोकअभिरक्षक ऍड. परमेश्वर शेळके यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य लोकअभिरक्षक ऍड.राजेंद्र विसपुते यांनी हे पथनाट्य लिहून दिग्दर्शित केले या पथनाट्यात विधी स्वयंसेवक सुशील भीमजियाणी, शाहीर उत्तम ओंकार इंगोले,मोतीराम खडसे,प्रभु कांबळे, शितल बन्सोड, राजकुमार पडघान,माधव डोंगरदिवे,जगदीश मानवतकर, संध्या सभादींडे, स्नेहल इंगोले आदींनी अभिनय केला. गणेशोत्सवाच्या दरम्यान संपूर्ण दहा दिवस या पथनाच्याचे वाशिम शहर व तालुक्यात सादरीकरण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here