Home बुलढाणा आता आरटीओ कर्मचारी २४ सप्टेंबर पासून उपसणार बेमुदत संपाचे हत्यार ! -आकृतीबंधाचा...

आता आरटीओ कर्मचारी २४ सप्टेंबर पासून उपसणार बेमुदत संपाचे हत्यार ! -आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

29
0

आशाताई बच्छाव

1000733494.jpg

आता आरटीओ कर्मचारी २४ सप्टेंबर पासून उपसणार बेमुदत संपाचे हत्यार ! -आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही ! बुलढाण्यासह राज्यात पुकारल्या जाणार संप!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ जिल्हा संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा मोटार वाहन (आरटीओ) विभागासाठी आकृतीबंध मान्यतेचा शासन निर्णय निर्गमित
झाला. अत्यंत नगण्य अशा पदोन्नतीच्या संधी असल्याने सदर शासन निर्णयाने कर्मचा-यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले. परंतू मागील दोन वर्षात काही तांत्रीक बाबींचा बाऊ करुन आकृतीबंधाच्या अंमलबजावणीस टोलवाटोलवी केली जात आहे.
शासन व प्रशासनाचा लक्षवेध करुन आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी, या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी बुलढाणासह राज्यातील आरटीओ कर्मचा-यांनी बेमुदत संपावर जाण्याचा
निर्णय घेतला आहे.

आकृतीबंधाची योग्य अंमलबजावणी न करताच, त्याचा आधार घेऊन मात्र संपूर्ण महाराष्टात महसूल विभाग स्तरावरील बदल्या करण्याचे सूत्र स्विकारुन प्रशासनाने नुकत्याच महसूली स्तरावर बदल्या केल्या आहेत. संघटनेच्या वतीने या महसुली स्तरावरील बदल्यास माहे डिसेंबर २०२२ पासून शासन प्रशासनान प्रत्यक्ष भेटून तीव्र विरोध दर्शविला आहे. महसूली विभाग स्तरावरील बदल्यांमुळे कर्मचारी वर्गास पदोन्नती तसेच सेवाविषयक अडचणी निर्माण झाल्या आहेत, यामुळे कर्मचारी भयभीत व संतप्त झाले असून शासन व प्रशासनाविरुध्द तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली
आहे.

आकृतीबंधानुसार पदांचे सेवाप्रवेश नियम गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयात निर्णयाविना पडून आहेत. प्रशासनाकडून कोणतीही उचित कार्यवाही होत नसल्याने सदरचे सेवा प्रवेश नियम प्रलंबित राहिले आहेत. राज्यात कामकाजात एकसुत्रता नसल्याने कर्मचारीवर्गास आणि विशेषतः जनतेस नाहक त्रास होत आहे, यासाठी संघटनेने मागणी केल्यानुसार गठित झालेल्या मा. कळसकर समितीचा अहवाल बासनात बांधून ठेवला आहे, कळसकर समितीचा अहवाल तात्काळ लागू करावा तसेच संगणक प्रणालीतील संभाव्य बदलाबाबत धोरण ठरविण्यात यावे, अशीही संघटनेची प्रमुख मागणी आहे.
वरिल प्रमुख रास्त मागण्यांसह जिव्हाळ्याच्या इतर प्रलंबित मागण्यांच्या आग्रहासाठी तीव्र संघर्ष करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने दि. ०८ सप्टेंबर २०२४ रोजी कार्यकारिणी सभेत घेतला. सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी दि. २४ सप्टेंबर २०२४ पासून “बेमुदत संपावर” जाऊन ते त्यांचा क्षोभ व्यक्त करणार आहेत.

शासन व प्रशासनाने आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने सत्वर अंमलबजावणी केल्यास हा संघर्ष टाळता येणे शक्य आहे. रास्त जिव्हाळयाच्या मागण्या, संवेदनशील शासना व प्रशासनाने मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी केली आहे.

Previous articleवर्षा’ निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन
Next articleशेतात पाणी.. डोळ्यात पाणी ! कृषी विभागाची मनमानी तर सरकारची लबाड वाणी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here