Home नांदेड जिल्हा रुग्णालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा .

जिल्हा रुग्णालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा .

16
0

आशाताई बच्छाव

1000733484.jpg

जिल्हा रुग्णालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा .

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड, दि. 10 सप्टेंबर : जिल्हा रुग्णालय नांदेड येथे प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी शेतकरी आत्महत्या व तरुणांच्या आत्महत्या कशाप्रकारे थांबवता येतील याबाबत मार्गदर्शन केले.

सदर सप्ताहनिमित्त जिल्ह्यात मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प अंतर्गत जनजागृतीपर विविध कार्यक्रम व मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच आशा यांच्यामार्फत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नैराश्यग्रस्त व मानसिक समस्याग्रस्त शेतकरी, विद्यार्थी व नागरिक यांनी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे ओपीडी क्रमांक 35 येथे मोफत समुपदेशन कक्ष कार्यान्वित असून यांचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

यावेळी प्रशिक्षणार्थी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भारती कुंडल यांनी जिल्हा रुग्णालयतील अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय नर्सिग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या झिने, एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पा गायकवाड, मानसोपचार तज्ञ डॉ. शाहू शिराढोणकर, मेट्रन सुनिता राठोड तसेच शासकीय नर्सिग महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल उदगीरकर यांनी केले तर प्रास्ताविक जयश्री गोरडवार यांनी केले व आभार प्रदर्शन मानसशास्त्रज्ञ डॉ. कैलास चव्हाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपाली मस्के, अरुण वाघमारे, बालाजी गायकवाड, प्रकाश आहेर, सुनिल तोटेवाड, सुनिल खंडागळे व अर्चना भोसले यांनी परिश्रम घेतले.

Previous articleज्येष्ठांना मिळेल मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा आधार.
Next articleपावसाळी क्रीडा स्पर्धेत आश्रम शाळा कमळेवाडीचा कबड्डी संघ अजिंक्य! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here