Home जळगाव लोंजे येथे एकावर कुऱ्हाडीने वार – डोक्याला गंभीर मार तर दोन्ही हात...

लोंजे येथे एकावर कुऱ्हाडीने वार – डोक्याला गंभीर मार तर दोन्ही हात फ्रॅक्चर

27
0

आशाताई बच्छाव

1000726656.jpg

लोंजे येथे एकावर कुऱ्हाडीने वार – डोक्याला गंभीर मार तर दोन्ही हात फ्रॅक्चर

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- किरकोळ वादाच्या कारणावरून दारूच्या नशेत एकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने व दोन्ही हातावर कुऱ्हाडीच्या दांड्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील लोंजे येथे दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दि 7 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास लोंजे तांडा ते चव्हाण तांडा रोडवर रमेश बुधा पवार यांचे दुकाना समोर आरोपी वसंत जगन जाधव याने दारुच्या नशेत येवुन रविंद्र मनोहर चव्हाण यास विनाकारण शिवीगाळ केली होती तेव्हा त्याला समजविण्याचा प्रयत्न केला होता.
त्याचा राग मनात धरून रमेश बुधा पवार यांचे दुकाना समोरुन सायकल वरुन जात असतांना दुपारी 4 वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत येवुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे हातातील कुऱ्हाड रविंद्र मनोहर चव्हाण याचे डोक्यात मारुन गंभीर जखमी केले तसेच त्याच कुऱ्हाडीच्या दांड्याने दोन्ही हाताचे कामेवर मारुन दुखापत केली व शिवीगाळ करुन तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
गंभीर जखमी अवस्थेत रवींद्र यास शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
रवींद्र चव्हाण याचे चुलत भाऊ सचिन अशोक चव्हाण 30 वर्षे, धंदा शेती रा. लोंजे (चव्हाण तांडा) ता.चाळीसगांव यांचे फिर्यादीवरून आरोपी वसंत जगन जाधव रा.लोंजे (चव्हाण तांडा) ता. चाळीसगांव याचे विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कलम 109, 118 (2), 352, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास psi लोकेश पवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here