Home पुणे भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना घेवून पिंपळे गुरव येथून...

भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना घेवून पिंपळे गुरव येथून पाच बसेस मार्गस्थ

13
0

आशाताई बच्छाव

1000726612.jpg

भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना घेवून पिंपळे गुरव येथून पाच बसेस मार्गस्थ
पुणे: ब्युरो चीफ उमेश पाटील
चिंचवड – पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी कोकणातील आपापल्या गावी जाणे सुलभ व्हावे, यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव येथून शुक्रवारी संध्याकाळी पाच बसेसमधून २५० हून अधिक बांधव कोकणाकडे मार्गस्थ झाले. भाजपा पदाधिकारी व कार्यकत्यांनी गणपती बाप्पाची आरती करून कोकणी बांधवांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व दिले जाते. गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते. गणेशोत्सव आणि कोकण हे एक अनोखं समीकरण नेहमीच पाहवयास मिळते. पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या प्रत्येक कोकणवासियांची गणपती उत्सवासाठी दरवर्षी लगबग सुरु असते. सहा महिने आधीच रेल्वे किंवा एसटी बुकिंग करण्यास सुरुवात होते. परंतु, आयत्यावेळी बुकिंग मिळणे कठीण होत असल्याने त्यांना प्रवासाला मुकावे लागते. पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या कोकणस्थ कुटुंबांना गणेशोत्सव आपल्या गावी साजरा करता यावा, यासाठी सावंतवाडी, कणकवली, मालवण, चिपळूण आदी ठिकाणी मोफत बस पाठवण्यात आल्या. यावेळी ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद राजापुरे, भाजपचे शहर सरचिटणीस अजय पाताडे, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, राहुल जवळकर, माजी नगरसेविका उषाताई मुंडे, माजी स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, विठ्ठल भोईर, गणेश बैंकेचे माजी अध्यक्ष संजय जगताप, संजय मराठे, सखाराम रेडेकर, उज्वला गावडे, शेखर चिंचवडे, दिपक जाधव, राजेंद्र चिंचवडे, पाटिलबुता चिंचवडे, अनिकेत दळवी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here