Home बुलढाणा एअरटेल टावरच्या केबलसाठी खोदलेल्या रस्त्याची लागली वाट ! -लाखो रुपयांच्या रस्त्याचे भवितव्य...

एअरटेल टावरच्या केबलसाठी खोदलेल्या रस्त्याची लागली वाट ! -लाखो रुपयांच्या रस्त्याचे भवितव्य धोक्यात! – खड्डयांमुळे नागरिक हैराण!

21
0

आशाताई बच्छाव

1000722914.jpg

एअरटेल टावरच्या केबलसाठी खोदलेल्या रस्त्याची लागली वाट ! -लाखो रुपयांच्या रस्त्याचे भवितव्य धोक्यात! – खड्डयांमुळे नागरिक हैराण!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
लोणार :- बुलढाणा एअरटेल कंपनीच्या टावरसाठी केबल टाकण्याकरिता खोदलेल्या नालीची ठेकेदाराने व्यवस्थित दबाई केली नाही. लाखो रुपयांचा रस्ताच खोदून काढला. आता या रस्त्याचे भवितव्य धोक्यात आले नव्हे तर होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या जीवावर देखील गदा आली आहे.
लोणार शहरात आठ दिवस आधी एअरटेल टॉवर कंपनीने आपले केबल टाकण्यासाठी मंठा रोड पासून माळीपुरा, गुलाबखा मोहल्ला या रस्त्याने नाली खोदली. एअरटेल च्या टावर पर्यंत केबल लाईन टाकण्यात आली. या रस्त्यावर आधीच भूमिगत गटार
पाईपलाईन खोदण्यात आली होती. त्यावर भरीसभर म्हणून टॉवरची केबल टाकण्यासाठी आणखी रस्ता खोदण्यात आला. भूमिगत गटार ठेकेदारांनी रस्त्याची व्यवस्थित दवाई केली होती. परंतु एअरटेलच्या ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे व भगदाड पडले आहे. रस्त्याचा पूर्णता धिंगाणा करून टाकला. या रस्त्यावर अपघात घडत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कामगाराला सांगितले असता कामगार आठ दिवसात खड्डे बुजवितो असे सांगून वेळ मारून नेत आहे. सदर खड्डे तात्काळ बूजविण्यात यावे, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Previous articleसाहेब योजना दिली पैसे कधी देणार सवडद येथील घरकुल योजना धारकांची मागणी ..
Next articleईश्वराची लीला अपरंपार माझ्या वाचनात आलेले अनुभव-मुरलीधर डहाके
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here