Home बुलढाणा साहेब योजना दिली पैसे कधी देणार सवडद येथील घरकुल योजना धारकांची मागणी...

साहेब योजना दिली पैसे कधी देणार सवडद येथील घरकुल योजना धारकांची मागणी ..

24
0

आशाताई बच्छाव

1000722901.jpg

साहेब योजना दिली पैसे कधी देणार सवडद येथील घरकुल योजना धारकांची मागणी ..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
सिंदखेडराजा :- बुलढाणा सिंदखेडराजा तालुक्यातील मौजे सवडद येथे शासनाने घरकुल योजनेचे घरकुल दिले आहे योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला आहे परंतु फक्त यादीमध्ये नावे आहेत आणि घरकुलचे घरकाम चालू करा असे तोंडी आश्वासन देऊन घरकुलधारकांनी आपले घराचे काम सुरू केले आहे परंतु त्यामुळे सवडद येथील घरकुल लाभार्थी हे कर्जबाजारी झाले आहे आज रेताचा सहा बरास रेती ट्रक घ्यायचा तर ब्लॅक मध्ये 36 ते 37 हजार रुपये मोजावे लागतात तर एक सिमेंटचे बॅक घ्यायची त्याला 340 ते साडेतीनशे रुपये लागतात तर 1000 विटा साठी सहा हजार रुपये लागतात हे सर्व गरीब लोक घरातून करू शकत नाही त्यांना कुठेतरी एखाद्या सोसायटी किंवा खाजगी सावकाराचे कर्ज घेऊन करावे लागते त्यामुळे घरकुल धारक हे कर्जबाजारी झाले आहेत त्यांना आता शासनाने जर पैसे दिले नाही तर आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही आज शेतकरी निसर्गाच्या आसमानी आणि सुलतानी संकटाशी लढत असतानाच आता हे एक सवडद येथील घरकुल लाभार्थ्यांच्या वर आर्थिक संकट आले आहे यातून कसे बाहेर पडावे हे येथील घरकुल लाभार्थी विचार करत आहे भागीरती दिगंबर देशमुख कडुबा किसन पिठले बंडू विठ्ठल मार्के भास्कर दाजीबा मार्के प्रकाश मोरे बेबी रामदास ठेंग दत्तात्रय भिकानराव देशमुख हे लाभार्थी शासनाच्या मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here