Home बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी उपसले आमरण उपोषणाचे अस्त्र ! -मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर...

आमदार संजय गायकवाड यांनी उपसले आमरण उपोषणाचे अस्त्र ! -मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर करणार उपोषण ! – सत्तेतील आमदार संजय गायकवाडांवर उपोषणाची वेळ का आली?

23
0

आशाताई बच्छाव

1000722878.jpg

आमदार संजय गायकवाड यांनी उपसले आमरण उपोषणाचे अस्त्र ! -मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर करणार उपोषण ! – सत्तेतील आमदार संजय गायकवाडांवर उपोषणाची वेळ का आली?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या
मागणीपूर्तीसाठी उपोषण, आंदोलन आणि यात्रा काढण्याचा जोर वाढलाय. अशात सत्ताधारी पक्षाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील आमरण उपोषणाचे अस्त्र हाती घेत, मंत्रालयातील अधिकारी काम करीत नसल्याचा ठपका ठेवून 12 सप्टेंबर रोजी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

सत्तेतील आमदार संजय गायकवाड ही उपोषणाची वेळ का आली? तर मुख्यमंत्र्यांनी एका वर्षाआधी बैठक घेतली. या बैठकीत आमदारांच्या कामांचा आदेश काढण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु एक वर्षानंतरही सदर कामाला गती आली नाही. दरम्यान
मागील 24 तारखेला पुन्हा बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसात आदेश काढा म्हटले तरीही कामांचे आदेश निघाले नाहीत. राज्यभर फिरायचे… धडपड करायची.. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न व इतर समस्या सोडवण्यासाठी मरमर करायची.. आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी खुर्ची उबवायची, कामात दिरंगाई करायची .. यामुळे वैतागाने उपोषणाचा निर्णय घेतल्याचे आमदार गायकवाड म्हणाले. जोपर्यंत कामांचा आदेश निघत नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उतरणार नाही, असा आमरण उपोषणाचा इशारा गायकवाड यांनी मुख्य सचिव सुजाता सवनिक यांना एका पत्रातून दिला आहे.

Previous articleभाजपाचा दुपट्टा गळ्यात घालून करत होता गुटखा सप्लाय ! – पोलिसांनी टाकली रेड, तब्बल 109786 रुपयांचा मुद्देमाल जप्त !
Next articleथरारक घटना! शेगाव रेल्वे स्थानकात महिलेची रेल्वे समोर उडी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here