Home बुलढाणा भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालून करत होता गुटखा सप्लाय ! – पोलिसांनी टाकली...

भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालून करत होता गुटखा सप्लाय ! – पोलिसांनी टाकली रेड, तब्बल 109786 रुपयांचा मुद्देमाल जप्त !

26
0

आशाताई बच्छाव

1000722873.jpg

भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालून करत होता गुटखा सप्लाय ! – पोलिसांनी टाकली रेड, तब्बल 109786 रुपयांचा मुद्देमाल जप्त !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
चिखली :-बुलढाणा भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकून दुचाकीवर अवैध गुटखा गल्लीबोळीत सप्लाय करणाऱ्या एका आरोपीला धाड टाकून पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून तब्बल 109786 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्तीची कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला. घनश्याम ठाकुरदास बंग रा. राऊतवाडी खलसे प्लॉट, चिखली असे आरोपीचे नाव आहे.
अवैध गुटखा माफीयांना जिल्ह्यात मोकळे रान मिळाल्याने प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक व खुलेआम होणारी विक्री वाढत असल्याचे चिंतादायी चित्र जिल्ह्यात दिसत आहे. चिखली येथील आरोपी घनश्याम बंग हा भाजपाचा पदाधिकारी आहे
आह
की कार्यकर्ता हे माहीत नाही. पण भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालून तो दुचाकी वररून छुप्या पद्धतीने अवैध गुटखा विक्रीचा काळा धंदा करीत आहे.
याची भनक चिखली पोलिसांना लागली. त्यामुळे पोलिसांनी 5 सप्टेंबरला खलसे प्लॉट येथे रेड केली. दरम्यान या आरोपीकडे तब्बल 109786 रुपयांचा एकूण मुद्देमाल आढळून आला. यामध्ये प्रिमीयम नजर 9000 एकुण 10 पोतडी प्रत्येक पोतडी मध्ये 45 पुडे प्रत्येकी किंमत 133 रुपये एकुण 59850 रुपये तसेच नजर प्रिमीयम 126 पुडे प्रत्येकी किंमत 195 रुपये एकुण 24570 रुपये, सुगंधीत राज निवास गुटखा 4 पोतडी प्रत्येक पोतडीध्ये 22 पॉकीट
प्रमाणे प्रत्येकी किंमत 192 रु एकुण 16896 रुपये तसेच केसर युक्त विमल पान मसाला (हीरव्या रंगाचे पॅकीट) एका पोतडी मध्ये 22 पुडे प्रत्येकी किमती 198 रु. असा एकुण 4356 रुपये आणि केसरयुक्त विमल पान मसाला (निळया रंगाचे पॅकीट) एक पोतडी मध्ये 22 पुडे प्रत्येकी किंमत 187 रु असा एकुण 4114 रुपये असा एकुण 109,786 रुपयांचा शासन प्रतिबंधीत गुटख्याचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 123, 223, 274, 275, भारतीय न्याय संहिता, सह कलम 26 (2), (iv), 26 (2), (v) .27 (2) (e) 30 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here