Home विदर्भ सारंगवाडी येथील अकरा वर्षीय चिमुकली पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर शासनाकडून चार लाखाची...

सारंगवाडी येथील अकरा वर्षीय चिमुकली पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर शासनाकडून चार लाखाची मदत.

38
0

आशाताई बच्छाव

1000722863.jpg

सारंगवाडी येथील अकरा वर्षीय चिमुकली पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर शासनाकडून चार लाखाची मदत.                                                             हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ 
आमदार राजू भैया नवघरे
हिंगोली जिल्ह्यातील एक सप्टेंबर यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने नदी नाले एकत्र झाले होते त्यात अनेकांची शेळ्या मेंढ्या गुरे वाहून गेली त्याचबरोबर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही शेतातील पाईपलाईन ठिबक स्पिंकलर असेही वाहून गेले आहे तर काही ठिकाणी मानवहानी सुद्धा पुराच्या पाण्याने झाल्याचे प्रकार झाला
वसमत विधानसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ तालुका अंतर्गत सारंगवाडी /गवळेवाडी येथील अकरा वर्षीय लहान चिमुकली पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यानंतर त्या कुटुंबांना वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांनी भेट दिली. भेटीनंतर काही कालावधीतच शासनाकडून चार लाख रुपयाची आर्थिक मदत केली तर त्यादिवशी त्याच गावातील नदिच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सारंगवाडी /गवळेवाडी येथील पुराच्या पाण्यात रात्रभर अडकून पडलेला संजय ठोंबरे यांच्या घरी जाऊन ठोंबरे यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्या कुटुंबाला भेट दिली त्यावेळेस सोबत औंढा नागनाथ येथील तहसीलदार हरीश गाडे बि.डि.ओ . गोरे साहेब तलाठी स्वामी मॅडम .ग्रामसेवक व इतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आमदार नवघरे यांच्यासोबत त्या ठिकाणी होते.
त्याचबरोबर वसमत विधानसभा मतदारसंघातील वसमत तालुक्यातील हट्यापासून जवळच असलेल्या ब्राह्मणवाडा या गावातील घामोडा नदीच्या पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माहिती मिळताच त्या ठिकाणी वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांनी ब्राह्मण गावात भेट देऊन घमोडा नदीच्या पात्राचे पाणी शेती शिरल्याने ब्राह्मणवाडा सहित इतर गावालाही त्याचा मोठी नुकसान झाल्याची पाहायला मिळाले आहे घामोडा नदीकाठील शेतीची पाहणी करून पीक पंचनामेचे माहिती करून घेतली .
शेतकऱ्याकडून नुकसानीची अधिकची माहिती घेऊन गाव पातळीवर संपूर्ण गावातील नागरिका शेतकरी यांच्या सोबत चर्चा केली व गावातील हनुमान मंदिर परिसरातील तीन शेडचे उद्घाटन केले
हिंगोली साठी श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली युवा मराठा न्यूज नेटवर्क 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here