Home विदर्भ आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या वतीने देण्यात आला 111 शिक्षकांना ‘गुरू गौरव पुरस्कार..’

आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या वतीने देण्यात आला 111 शिक्षकांना ‘गुरू गौरव पुरस्कार..’

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20240907-WA0055 1000722785.jpg

आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या वतीने देण्यात आला 111 शिक्षकांना ‘गुरू गौरव पुरस्कार..’.                    हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ 

वसमत विधानसभेचे कार्य कुशल आमदार राजूभैय्या उर्फ चंद्रकांत रमाकांत नवघरे यांच्यातर्फे शुक्रवारी विधानसभा कार्यक्षेत्रातील 111 शिक्षकांचा ‘गुरू गौरव पुरस्कार 2024’ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख यु. टी. पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ.जगदीश कदम, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर,वसमतचे गटशिक्षणाधिकारी सुभाष सोनटक्के, औंढा प. समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी विवेक पेडगावकर, सतिश कास्टे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गुणाजी ढोरे, पांडुरंग लांडगू, साहेबराव कदम, रामराव व-हाड,रामराव जाधव, मुख्याध्यापक विठ्ठलराव पवार, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य सल्लागार विश्वनाथ सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, व्ही. डी. देशमुख,सचिव रामभाऊ मूटकूळे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर, त्र्यंबक कदम तालुकाध्यक्ष,मुबिन भाई, बालुमामा ढोरे, नम्मु भाई, यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. वसमतच्या मयुर मंगल कार्यालयालय मोठ्या दिमाखदार सोहळ्यात हा कार्यक्रम संपन्न झाला.
साहित्यिक जगदीश कदम यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षकांवर पडणार्‍या अतिरिक्त कामांचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच, समाजातील शिक्षकाचे स्थान अबाधित असून त्यांचे कार्य खूपच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के आणि प्रशांत डिग्रसकर यांनीही सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षण ही समाजाची प्राथमिक गरज आणि प्रशासनाचे आद्यकर्तव्य आहे, सामाजिक उत्तरदायित्त्व म्हणून मी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि दरवर्षी अखंडपणे करीत राहणार असे आपल्या मनोगतातून आमदार राजूभैय्या नवघरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सद्यस्थितीतील शिक्षण पद्धती आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी मी प्रयत्न करीन. पुढे बोलताना ते म्हणाले सर्वस्तरातील विद्यार्थ्यांना उत्तम माणूस घडविण्यासाठी शिक्षक महत्त्वाचा घटक आहे. मीही माझ्या गुरूजींमुळेच घडलो.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांतून युवराज गरूड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे कुठलीही फाईल न करता मिळालेला हा पहिलाच सन्मान असून त्यामुळे पुढे काम करण्यासाठी नवीन उर्जा मिळणार आहे.सदरील पुरस्काराचे उत्तरदायित्त्व म्हणून आम्ही सर्वजण शैक्षणिक,सामाजिक उत्थानासाठी कटिबद्ध राहतील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य शिवदास पोटे यांनी केले. तर संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.केशव खटींग यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला. सुत्रसंचालन प्रा. गिनगीने सर यांनी केले. तर मानपत्राचे वाचन श्रीमती उषा घोडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मदन कदम, रामेश्वर ढोणे, रवी पडोळे,गजानन इंगोले, अमोल शर्मा, उद्धव दाभाडे,पद्मसिंह जाधव, गजानन सोळंके, विठ्ठल कानोडे, सुनील पाटील,श्रीहरी साबळे,प्रा. सतिश बागल, डॉ. दीपक कातोरे यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleस्वर्गीय वाडीलाल भाऊ राठोड उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींचे कबड्डी स्पर्धेत यश
Next articleसारंगवाडी येथील अकरा वर्षीय चिमुकली पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर शासनाकडून चार लाखाची मदत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here