Home जळगाव ग्रामीण भागापर्यंत आरोग्याची सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण.

ग्रामीण भागापर्यंत आरोग्याची सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण.

21
0

आशाताई बच्छाव

1000722737.jpg

ग्रामीण भागापर्यंत आरोग्याची सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण.
————————————————–
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. मंत्री गिरीश महाजन, आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहकार्याने व आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी चाळीसगाव व निरामय सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून दि 4 रोजी सकाळी 11 वाजेपासून सायंकाळपर्यंत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील मैदानात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात वाडिया हॉस्पिटल मुंबई, व लाइफ केअर हॉस्पिटल नाशिक येथील नामांकित सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून हजारो रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले.
शिबिराचे उदघाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की चाळीसगाव येथे आम्ही जागर आरोग्याचा माध्यमातून मोफत आरोग्य, नेत्र व मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले याठिकाणी बरेचशे नामांकित, प्रख्यात डॉक्टर आणून लाईफकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदत सहाय्यता कक्षातून मंत्री गिरीश महाजन, रामेश्वर नाईक यांच्या नेतृत्वाखाली चांगला मोठा कॅम्प येथे आयोजित केला आहे.
यामध्यमातून ग्रामीण भागापर्यंत जे मोठे आजार आहेत त्याचे निदान, आरोग्याची सेवा पोहोचू शकत नाही त्या सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here