Home बीड परळीत सरस्वती नदीच्या पुराने बाधित झालेल्या ५५० पेक्षा अधिक कुटुंबांना धनंजय मुंडेंच्या...

परळीत सरस्वती नदीच्या पुराने बाधित झालेल्या ५५० पेक्षा अधिक कुटुंबांना धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान कडून प्रत्येकी १० हजारांची मदत!

60
0

आशाताई बच्छाव

1000722715.jpg

परळीत सरस्वती नदीच्या पुराने बाधित झालेल्या ५५० पेक्षा अधिक कुटुंबांना धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान कडून प्रत्येकी १० हजारांची मदत!

तातडीच्या आपत्ती निधीतूनही प्रशासनाकडून प्रत्येक कुटुंबाला ०५ हजारांची मदत; रविवारी धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत एकत्रित होणार वितरण

प्रत्येक बाधित कुटुंबाला मोफत धान्याच्या किटही देणार

मोहन चव्हा/

ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीडपरळी   परळी वैजनाथ शहरात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरस्वती नदीला आलेल्या पुरात ५५० पेक्षा अधिक कुटुंब बाधित होऊन त्यांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य धान्य आदींचे नुकसान झाले होते. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने ५५० पेक्षा अधिक कुटुंबांना प्रतिक कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत रविवारी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.

आपत्ती व्यवस्थापनाच्या तातडीच्या आपत्ती निवारण निधीतून देखील प्रशासनाच्या वतीने या प्रत्येक बाधित कुटुंबाला नियमाप्रमाणे प्रत्येकी ५,००० रुपये याप्रमाणे तातडीची मदत देखील धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे. सरस्वती नदीला आलेल्या पुरानंतर धनंजय मुंडे यांनी या भागात प्रत्यक्ष जाऊन नागरिकांच्या भेटी घेत त्यांना धीर व दिल्यास दिला होता तसेच प्रशासनाला तात्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

शासनाच्या नियमानुसार पुराच्या पाण्याने नुकसान होऊन घरातील भांडी कपडे धान्य आदींचे नुकसान झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत दिली जाते, शासनाच्या बरोबरीने किंबहुना त्याहूनही दुप्पट मदत नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने धनंजय मुंडे यांच्याकडूनही दिली जात आहे.

परळी वैजनाथ शहरातील बरकत नगर, रहिमत नगर, भीमा नगर, स.क्र.७५ यांसह विविध भागातील बाधित कुटुंबीयांना यामुळे दिलासा व आधार मिळणार आहे. या दोन्ही मदतीचे रोखीने धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी एकत्रितपणे दुपारी एक वाजता श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या स्व.पंडित अण्णा मुंडे सभामंडपात वितरण करण्यात येणार असल्याची माहिती नाथ प्रतिष्ठानचे कार्यवाह वाल्मिक अण्णा कराड यांनी दिली आहे.

Previous articleपरळीत धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने यंदा १९ व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन!
Next articleअशोकनगर येथील मागासवर्गीय दलित समाजाच्या दफनभूमीसाठी ग्रामपंचायती कडे जागेची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here