Home बीड परळीत धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने यंदा १९ व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश...

परळीत धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने यंदा १९ व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन!

48
0

आशाताई बच्छाव

1000719473.jpg

परळीत धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने यंदा १९ व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन!

पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना व रामायणातील सिता शनिवारी परळीत येणार

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी साजरा केला जाणारा व महाराष्ट्राभर ख्याती असलेला श्री. वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव यावर्षी १९ व्या वर्षात पदार्पण करत असून यावर्षी देखील श्री गणेश महोत्सवाचे परळी शहरात येत्या शनिवारपासून दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी दि: ०७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी नामदार श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभमुहूर्तावर श्रींची स्वर्गीय पंडितअण्णा सभागृह जत्रा मैदान परळी येथे विधिवत स्थापना करून या गणेश महोत्सवास सुरुवात होईल. या गणेश महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली पुष्पा प्रेम अभिनेत्री रश्मिका मंदांना तसेच रामायण चित्रपटातून देशाच्या घराघरात पोहोचलेली सितेचा अभिनय अत्यंत उत्कृष्टरित्या केलेली अभिनेत्री क्रिती सनोन या दोघींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावर्षीच्या गणेश महोत्सवात किती वर्षापेक्षाही उत्तम दर्जाच्या कलाकारांच्या उपस्थितीत परळी वासियांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी मेजवानी गणेशउत्सवाचे १० ही दिवस अनुभवायला मिळणार आहे.
असे आहेत कार्यक्रम: पहिल्या दिवशी ०७ सप्टेंबर शनिवारी अभिनेता संकर्षण कराडे त्याचबरोबर सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, तेजा देवकर, ऋतुजा जुन्नरकर, पुनम कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी ०८ सप्टेंबरला रविवारी सायंकाळी प्रसिद्ध गायक कैलास खेर व गायिका अभिलिप्सा पांडा यांच्या शिव भजन गीतांचा कार्यक्रम होईल. ०९ सप्टेंबर अभिनेत्री अमृता खानविलकर, पूजा सावंत, समीरा गुजर, संस्कृती बालगुडे प्रसन्नजीत कोसबी व अशिका चोनकर यांचा महाराष्ट्राच्या तारखा हा सुप्रसिद्ध संगीतमय कार्यक्रम. १० सप्टेंबर मंगळवार सुप्रसिद्ध बॉलीवूड सिनेतारका ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांचा राधाकृष्ण लीला दर्शवणारी शास्त्रीय नृत्याद्वारे विशेष प्रस्तुती. ११ सप्टेंबर बुधवार महाराष्ट्राची संस्कृती अंतर्गत या अभिनेत्री मानसी नाईक, माधुरी पवार, मीरा जोशी, हेमलता बने, ऐश्वर्या बदडे यांचा संगीतमय कार्यक्रम. १२ सप्टेंबर गुरुवार इंडियाज गॉट टॅलेंट फ्रेम क्रेझी हॉपर्स ग्रुप आग्रा यांचा नृत्य थरार व हिंदवी पाटील व प्राजक्ता गायकवाड लावणी यांची जुगलबंदी. १३ सप्टेंबर शुक्रवार चला हवा येऊ द्या सहभाग – स्मिता गोंदकर, जुई बेंडकले, हेमांगी कवी, सागर करंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, श्रेया बुगडे व इतर. १४ सप्टेंबर शनिवार महाराष्ट्राची हास्य जत्रा सहभाग – समीर चौगुले, पृथ्वीक प्रताप, नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, चेतना भट व इतर. १५ सप्टेंबर रविवार अजय अतुल लाईव्ह जगप्रसिद्ध गायक, गीतकार व संगीतकार अजय व अतुल गोगावले यांचा ५० कलाकारांच्या संचासह लाईव्ह गीतांचा कार्यक्रम. १६ सप्टेंबर सोमवार प्रसिद्ध गायक आनंद शिंदे व टीमचा भीम गीतांचा खास कार्यक्रम. दरम्यान या गणेशोत्सवाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी वासियांना तसेच बीड जिल्ह्यातील गणेश भक्तांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी मेजवानी अनुभवास मिळणार असून या गणेश महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. असे आवाहन ज्येष्ठ नेते तथा नाथ प्रतिष्ठानचे कार्यवाहक वाल्मीक अण्णा कराड यांनी केले आहे.

Previous articleमनस्वी ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण
Next articleपरळीत सरस्वती नदीच्या पुराने बाधित झालेल्या ५५० पेक्षा अधिक कुटुंबांना धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान कडून प्रत्येकी १० हजारांची मदत!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here