Home बुलढाणा मेहकर मध्ये जिजामाता करिअर अकॅडमी उघडून, युवकांना सैन्यामध्ये भरती करून देण्याचे आमिष...

मेहकर मध्ये जिजामाता करिअर अकॅडमी उघडून, युवकांना सैन्यामध्ये भरती करून देण्याचे आमिष दाखवून केली कोट्यवधी रुपयांनी फसवणूक.

18
0

आशाताई बच्छाव

1000719011.jpg

मेहकर मध्ये जिजामाता करिअर अकॅडमी उघडून, युवकांना सैन्यामध्ये भरती करून देण्याचे आमिष दाखवून केली कोट्यवधी रुपयांनी फसवणूक.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जिजामाता करिअर अकॅडमी या नावाने बोगस अकॅडमी उघडून युवकांना सैन्य व पोलीस दलाचे भरतीपूर्व प्रशिक्षणा सोबतच सैन्यामध्ये व पोलीस दलामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून एक-दोन नव्हे तर तब्बल ४० गोरगरिबांच्या मुलांना तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांनी गंडवल्याची खळबळजनक घटना ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की प्रदीप खिल्लारे याने मेहकर येथे जिजामाता करिअर अकॅडमी या नावाने बोगस अकॅडमी सुरू केली होती या अंतर्गत तो युवकांना पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण द्यायचा. यासोबतही त्याने गोरगरिबांच्या मुलांकडून नोकरीला लावतो असे आमीष दाखवले व २०१९ ते २०२१ या कालावधीत तब्बल एक-दोन नव्हे तर ४० युवकांना कोट्यावधी रुपयांनी गंडवले . त्याच्यासोबत पत्नी पूजा खिल्लारे, प्रशांत खिल्लारे, वडील एकनाथ रंगनाथ खिल्लारे, व आई रत्नमाला खिल्लारे हे सुद्धा त्याचे साथ देत होते. प्रदीप खिल्लारे व त्याचे संपूर्ण कुटुंब मेहकर येथील नगरपरिषद शाळा क्रमांक ५ जवळच राहतात.
आरोपी प्रदीप खिल्लारे याने मेहकर येथील राजीव गांधी व्यापारी संकुल येथे जिजामाता करिअर अकॅडमी या नावाने कार्यालय सुरू केले होते. परंतु या अकॅडमीची कुठलीही नोंदणी नसताना सुद्धा प्रदीप खिलरे यांने आपले कार्यालय थाटले होते. नोकरीची विचारणा केली असता विश्वास ठेवा नियुक्त पत्र आणून देतो असे प्रदीप खिल्लारे सांगत होता. व नेहमी टाळाटाळ करत होता ज्यावेळेस आपली फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले तेव्हा आपले पैसे परत मागण्यासाठी मागणी केली असता प्रदीप खिल्लारे हा ॲट्रॉसिटीच्या धमक्या देत असल्याचे दिसून आले.
याप्रकरणी मिलिंद नगर, मेहकर येथील चिक्रुल्ला गुलाब शेख या युवकाने मेहकर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. यानुसार मेहकर पोलिसांनी कलम ४२०,५०६,३४ नुसार गुन्हे दाखल करून आरोपी प्रदीप खिल्लारे यास अटक केली आहे व बाकीचे आरोपी फरार आहेत.

Previous articleओला दुष्काळ जाहीर करून सर्वसकट नुकसान भरपाई देण्यात यावी….
Next articleगडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here