Home गडचिरोली भव्य संविधान जागर यात्रेचे गडचिरोलीत आगमन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष...

भव्य संविधान जागर यात्रेचे गडचिरोलीत आगमन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते संविधान जागर यात्रचे स्वागत.

43
0

आशाताई बच्छाव

1000691177.jpg

भव्य संविधान जागर यात्रेचे गडचिरोलीत आगमन

भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते संविधान जागर यात्रचे स्वागत.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- 

संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त संविधान जागर यात्रा २०२४ चे आज गडचिरोली शहरामध्ये आगमन झाले असता, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

स्थानिक आठवडी बाजार हनुमान वार्ड येथील हनुमान मंदिर येथे दर्शन घेवुन संविधान जागर यात्रेचे प्रारंभ करण्यात आले.शहरातील सराफा मार्गाने फुले वार्ड येथील संत रोहिदास मंदिर येथे समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मंचावर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे,मा.वाल्मिकी (तात्या)निकाळजे,राजेंद्र गायकवाड,आमदार डॉ. देवरावजी होळी,आमदार कृष्णाजी गजभे,माजी खासदार अशोकजी नेते,भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,गडचिरोली विधानसभा निवडनुक प्रमुख इंजि.प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,उमेशजी वालदे,जनार्धन साखरे,प्रा.अरुण उराडे,योजनाताई ठोकले,स्नेहाताई भालेराव,देवाजी लाटकर,आकाश अंभारे, विजय गव्हाळे,नागसेन पुडके यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleश्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य-दिव्य दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन.
Next articleअरीबा शेख राज्यात दुसरी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here