Home बुलढाणा आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा एकाएकी कोसळून पडला,त्यासाठी दोषी असलेले मंत्री...

आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा एकाएकी कोसळून पडला,त्यासाठी दोषी असलेले मंत्री रविंद्र चव्हाण व ईतर यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा:- संभाजी ब्रिगेड…..

31
0

आशाताई बच्छाव

1000689985.jpg

आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा एकाएकी कोसळून पडला,त्यासाठी दोषी असलेले मंत्री रविंद्र चव्हाण व ईतर यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा:- संभाजी ब्रिगेड…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- नांदुरा छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे.छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा,अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे.शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे.असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही बाब अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे. या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी केलेले होते.भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली,कर्तुत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपणास मागणी आहे.आपण जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या घोर अपमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल. त्यामुळे आपण ताबडतोब दोषींवर कठोर कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमची तीव्र मागणी आहे या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेड नांदुरा कडून नांदुरा तहसील मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष योगेश पाटील,जिल्हा कार्यवाहक अमर रमेश पाटील,नांदुरा तालुका उपाध्यक्ष दिलीप कोल्हे,तालुका उपाध्यक्ष सचिन बाठे,तालुका संपर्क प्रमुख सचिन गणगे,वाहतूक शाखा तालुकाध्यक्ष अमोल भगत,शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,रुपेश पवार,अरुण सुरवाडे,दिलीप इंगळे,अशोक कोल्हे,विनायक धांडे,अभिषेक सोळंके,सोहम जवंजाळ,दीपक टहलानी,सोपान पाटील, व इतर संभाजी ब्रिगेड सदस्य उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here