Home बुलढाणा सुविधांचा दुष्काळ ! एका विहीरीवर खैरखेड्याची मदार, पेयजलासाठी करताहेत नदी पार !...

सुविधांचा दुष्काळ ! एका विहीरीवर खैरखेड्याची मदार, पेयजलासाठी करताहेत नदी पार ! – समस्या सोडवा अन्यथा रास्ता रोको !

22
0

आशाताई बच्छाव

1000689767.jpg

सुविधांचा दुष्काळ ! एका विहीरीवर खैरखेड्याची मदार, पेयजलासाठी करताहेत नदी पार ! – समस्या सोडवा अन्यथा रास्ता रोको !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा सध्या पाऊस आहे.. गावाजवळ नदी आहे.. परंतु खैरखेडा हे गाव केवळ एका विहिरीवर अवलंबून असून ग्रामस्थांना तुडुंब भरलेली नदी ओलांडून पाणी भरावे लागत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आलाय. तसा गावात मूलभूत सुविधांचा दुष्काळ पाचवीलाच पूंजलेला असून याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी 8 दिवसात समस्यां न सुटल्यास आझाद हिंदचे अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांच्यासमोर ‘रास्ता रोको’चा निर्धार व्यक्त केलाय.
मोताळा तालुक्यातील राजुर घाटातील
वसलेलं खैरखेड गाव समस्यांच्या विळख्यात सापडले. मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याची एकच विहिर आहे. सदर विहिरीवर गावाबाहेर नदीपात्र ओलांडून जावे लागते. नदी खोलीकरणामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि पाणी वाढले. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वाहत्या पाण्यातून नदी पार करावी लागते. सदर नदीवर ये-जा करण्यासाठी आत्यावश्यक पुलाची मागणी गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधितांकडे केली. तर आजही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना नदीच्या पात्रातून प्रसंगी पुरातून मार्ग काढत पिण्याचे पाणी भरावे लागत आहे. दरम्यान मागील दोन महिन्यात
बुलडाणl
गावातील आठ ते दहा महिला पाणी भरता भरता पडल्या आणि त्या दुखापतग्रस्त झाल्या. रस्ते नाही. पूरेशी लाईट नाही. रस्ते नसल्यामुळे एसटी नाही. विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी ही ससेहोलपट होत आहे. शासन प्रशासनाला निवेदन तक्रार देऊन काही उपयोग झाला नाही. आज 27 ऑगस्ट ला अँड रोठेंना यांच्यापुढे ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला. दरम्यान आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांनी खैरखेड गावाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. गावकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. आठ दिवसात समस्या सोडवाव्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.

Previous articleकोणालाही पाडण्यासाठी काही भाऊ सुपारी घेतात: आता माफी नाही, हिशोब होणारच, बच्चुभाऊ कडूच्यां बालेकिल्ल्यात नवनीत राणा कडाडल्या.
Next articleआमदारांची जीभ झाली ‘तिखट !’ -काय म्हणाले संजय गायकवाड ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here