Home अमरावती स्वच्छतेच्या २ कोटीच्या बिलासाठी”बॅकडेट”स्वाक्षरी; स्वच्छता चा ठेकेदारांनी लढविली शक्कल. उपायुक्त्याच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा.

स्वच्छतेच्या २ कोटीच्या बिलासाठी”बॅकडेट”स्वाक्षरी; स्वच्छता चा ठेकेदारांनी लढविली शक्कल. उपायुक्त्याच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा.

28
0

आशाताई बच्छाव

1000689763.jpg

स्वच्छतेच्या २ कोटीच्या बिलासाठी”बॅकडेट”स्वाक्षरी; स्वच्छता चा ठेकेदारांनी लढविली शक्कल. उपायुक्त्याच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा.
दैनिक युवा मराठा 
पी.एन.
देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती महानगरपालिकेत यापूर्वीच्या साफसफाई कॉन्ट्रॅक्टदाराच्या तब्बल २ कोटी रुपयांच्या देखावर तत्कालीन आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवारी, २२ ऑगस्ट २०२४ रोजी “बॅक डेट”स्वाक्षरी केल्याची विश्वास प्रिय माहिती आहे. यात’अर्थपूर्ण’राजकारण झाले असून, आता ही फाईल उपायुक्त (स्वच्छता) स्वाक्षरी करुन ही मंजूर करण्यात काय, याकडे महापालिका वर्तुळात नजर लागल्या आहेत. हल्ली ही फाईल आरोग्य विभागात आहे. येथील शासकीय विश्राम भावना तत्कालीन आयुक्त देविदास पवार गुरुवारी आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पवार यांच्या कार्यकाळातील अगोदरच्या साफसफाई कॉन्ट्रॅक्टदारांची २ कोटीची देयके प्रलंबित असल्याचे समजते. यात सुमारे २५ देयके असून, या देवकाची फाईल विश्राम भवनात महापालिका स्वच्छता विभागाचे प्रमुख आणि लिपी हे घेऊन गेले होते. या फाईलवर तत्कालीन आयुक्त देविदास पवार यांनी साफसफाई कॉन्ट्रॅक्टदाराच्या समक्ष” बॅक डेट”स्वाक्षरी केली. याकरिता’अर्थपूर्ण’राजकारण झाले. मात्र, आता या”बॅक डेट”टिळकांच्या फाईलवर स्वच्छता विभागाच्या उपयुक्त आजच्या तारखेत स्वाक्षरी करतात की ही फाईल नाकारतात, हे उत्सकाचे ठरणार आहे. कारण उपयुक्त या अमरावती महानगरपालिकेत १२ जुलाई २०२४ रोजी रुजू झाले आहेत. तथापि स्वच्छतेच्या २ कोटीची देयके ही त्या रुजू होण्यापूर्वी चे आहेत. आठ ते दहा सफाई कॉन्ट्रॅक्टदाराची ही देख आहेत. मात्र, तत्कालीन आयुक्त पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात ही फाईल मंजूर का केली नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. शहरात खरेच स्वच्छता कामे झाले असेल तर आता कॉन्ट्रॅक्टदारांची देयक अदा करण्यास का केली जाते, असाही सवाल महानगरपालिका वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. आयुक्त सचिन कलंत्री साहेब कोणता निर्णय घेणार? स्वच्छतेबाबत कंत्राटदारांचे सुमारे २ कोटीची देखे आता मध्ये तत्कालीन आयुक्त देवदास पवार मंजूर केली आहे. खरंतर पवार यांनी ४ जुलै रोजी पदभार सोडला होता. आता या फाईलवर उपयुक्त यांची स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे. अण्णा काही फाईल पुढे आयुक्त कडे जाणार नाही. अशी नियमावली आहे. सफाई कंत्राटदारांनी तत्कालीन आयुक्त पवारांना बोलावून स्वाक्षरी करून घेतली. त्यामुळे आता ही फाईल विद्यमान आयुक्त सचिन कलंक्रे साहेब मंजूर करतात काय हे महत्त्वाचे ठरणार आहे. फार्म २२ वर आयुक्त स्वाक्षरी करणार काय? महापालिका उपयुक्त यांच्या कडे स्वच्छता विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे साफसफाईची निगडित कंत्राटदारांची दोन कोटीची थकीत अदा करण्यासाठी त्या फार्मवर २२ वर स्वाक्षरी करणार का? याकडे उद्या महापालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे. देवाची फाईल आरोग्य विभागात असून, तत्कालीन आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवारी ओके केले आहे. त्यामुळे या बॅक डेट फाईलवर उपायुक्त यांनी स्वाक्षरी केल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टदारांना देयक मिळणार नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे.

Previous articleबद्दली झालेल्या लाईनमॅनचा येवती येथे भव्य नागरीक सत्कार !
Next articleकोणालाही पाडण्यासाठी काही भाऊ सुपारी घेतात: आता माफी नाही, हिशोब होणारच, बच्चुभाऊ कडूच्यां बालेकिल्ल्यात नवनीत राणा कडाडल्या.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here