Home नांदेड बद्दली झालेल्या लाईनमॅनचा येवती येथे भव्य नागरीक सत्कार !

बद्दली झालेल्या लाईनमॅनचा येवती येथे भव्य नागरीक सत्कार !

208
0

आशाताई बच्छाव

1000689760.jpg

बद्दली झालेल्या लाईनमॅनचा येवती येथे भव्य नागरीक सत्कार !

∆ येवती येथे लाईनमॅन म्हणून दहा वर्ष सेवा केल्यानंतर मुखेड येथे बद्दली !

मुखेड ता. प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील तिर्थक्षेत्र येवती येथे लाईनमॅन लक्ष्मण देविदास जाधव यांनी दहा वर्ष प्रमाणिक सेवा केल्यानंतर त्यांची बद्दली मुखेड शहरात झाली असून येवती येथे दहा वर्ष सेवा केल्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांकडून भव्य नागरिक सत्कार करण्यात आला आहे.

येवती येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून याचं जयंती मंडळाच्या कार्यक्रमात लाईन मॅन लक्ष्मण देविदास जाधव यांचा जयंती मंडळ व समस्त गावकऱ्यांच्या वतीने पत्रकार विठ्ठल पाटील यांच्या हस्ते लाईनमॅन लक्ष्मण जाधव यांना जोड आहेर करून सहपत्नी भव्य नागरिक सत्कार करण्यात आला आहे . लाईनमॅन लक्ष्मण जाधव यांचा थोडक्यात परिचय लक्ष्मण देविदास जाधव हे रा. कमलानगर जिरगा तांडा येथील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण १ ते १० वी कमळेवाडी १० ते १२ वी चव्हाणवाडी १२ ते B.A.F. एम.जी.पी. कॉलेज मुखेड येथे झाले असून त्यांनी मुखेड येथील शासकीय तंत्र प्रशिक्षण संस्था येथे आय.टी.आय. पूर्ण केल्यानंतर प्रथम ते विद्युत सहाय्यक म्हणून येवती येथे 22 जुलै 2014 – झाली लाईन मॅन म्हणून रुजू झाले . गेल्या दहा वर्षात येवती येथे त्यांनी विविध पदावर चांगल्या प्रकारे काम केले असून प्रथम ते विद्युत सहाय्यक नंतर तंत्रज्ञ, व शेवटी ते वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांची नुकतच मुखेड शहरांमध्ये बदली झाली आहे . येवती येथे दहा वर्षाच्या काळात त्यांनी त्यांच्या विद्युत कामात कसली कमतरता न भासू देता अनेक गोरगरिबांची त्यांनी प्रमाणिक सेवा केली . ते स्वभावाने प्रेमळ शांत व संयमी मनमिळाऊ वृत्तीचे होते. त्यांना कसल्याच गोष्टीचा राग नव्हता. त्यांच्याकडून आत्तापर्यंत कोणालाही कसलाही त्रास झालेला नाही . म्हणून त्यांची एकही तक्रार आत्तापर्यंत गावकऱ्यांनी वर केली नाही हे विशेष बाब आहे. नुकतच त्यांची बदली झाल्यामुळे गावकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असून असा लाईन मॅन पुन्हा भेटणार नाही अशी भावना नागरिकातून व्यक्त केली जात होती. तर दुसरीकडे आम्हाला गावात हाच लाईनमॅन पाहिजे . त्यांनी पुन्हा गावात परत यावे अशी मागणी कार्यकर्त्याकडून करताना दिसून येत होती. त्यांच्या याच प्रमाणिक सेवेबद्दल गावकऱ्यांनी येवती येथे दि. 25 ऑगस्ट २०२४ रविवारी येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात लाईनमॅन लक्ष्मण जाधव यांचा सहपत्नी भव्य नागरिक सत्कार केला गेला . यावेळी उपस्थित अनेक चाहत्यांनी सुद्धा त्यांना शाल शिरफळ व पुष्पगुच्छ देऊन लाईनमॅन जाधव यांचा सन्मान केला. गावकऱ्यांनी करीत असलेला भव्य नागरिक सत्कार पाहून लाईनमॅन लक्ष्मण जाधव यांचे डोळे पाणावले होते. ‘मी गावचा उपकार कधी विसरू शकणार नाहीत’ असे भावना लाईनमॅन लक्ष्मण जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. यावेळी प्रथम जयंती मंडळाचे अध्यक्ष किसन वाघमारे यांनी सुद्धा मंडळाच्या वतीने लाईनमॅन लक्ष्मण जाधव यांना शाल शिरपळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी या कार्यक्रमाला गावातील युवा सरपंच डॉ. उमेश पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत घाटे, उपसरपंच बालाजी नागरगोजे, माजी सरपंच निळकंठ सुभेदार, पंचायत समिती सदस्य वसंतराव पाटील येवते , युवा उद्योजक पद्माकर पाटील येवतीकर, पोलीस पाटील बालाजी रामपुरे , जयंती मंडळाचे अध्यक्ष किसन वाघमारे, श्री सद्गुरु नराशाम महाराज इंग्लिश स्कूलचे संचालक आनंदराव राठोड , तंटामुक्तीचे अध्यक्ष तुळशीराम कांबळे, माजी सैनिक खंडू कांबळे, मातंग समाजाचे कार्यकर्ते ज्ञानोबा घाटे, काँग्रेसचे कार्यकर्ते शेख मैनोदीन येवतीकर ,लक्ष्मण पाटील गोपनर,व अण्णाभाऊ साठे , जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते , शालेय विद्यार्थी, गावातील महिला व पुरुष, तसेच युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here