Home अमरावती तेलंगणाचा आमदार: यांचा तिवसा पोलिसांनी रोखला ताफा. भाजप पदाधिकारासोबत तू ,तू,मैं,मैं, टी...

तेलंगणाचा आमदार: यांचा तिवसा पोलिसांनी रोखला ताफा. भाजप पदाधिकारासोबत तू ,तू,मैं,मैं, टी राजा डिटेन, आक्षेपार्य वक्तव्य न करण्याच्या अटीवर सोडले.

74
0

आशाताई बच्छाव

1000687330.jpg

तेलंगणाचा आमदार: यांचा तिवसा पोलिसांनी रोखला ताफा. भाजप पदाधिकारासोबत तू ,तू,मैं,मैं, टी राजा डिटेन, आक्षेपार्य वक्तव्य न करण्याच्या अटीवर सोडले.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
परतवाडा येथील दहीहंडा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी येत असलेले तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंह यांना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दिवसा पोलिसांनी रोखले. सुमारे तासभर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये डिटेल करण्यात आले होते. कुठलेही आक्षेपार्य वक्तव्य न करण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आले. हैदराबादच्या गोशा महल मतदार संघाचे आमदार असलेले टी. राजा सिंह यांची अनेक वक्तव्य वादग्रस्त ठरली आहे. परतवाडा येथील कार्यक्रमात येणार असल्याचे अमरावती ग्रामीण पोलिसांना समजताच मंगळवारी दुपारी दिवसा येथील पेट्रोल पंपाजवळ त्यांचा ताफा रोखण्यात आला. यामुळे त्यांच्यासह भाजप पदाधिकारासोबत पोलिसांची तू ,तू , मै, मैं, झाली. त्यांचा होता त्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना देखील त्याबाबत माहिती देण्यात आली. सुमारे एक तास मोठा ड्रामा रंगल्या नंतर परतवाडा येथील दहीहंडी सोहळ्या दरम्यान कुठलेही अक्षय पारेख व्यक्त करणार नाही तसेच दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असे भाषण देखील करणार नाही, असे टी. राजा सिंह यांनी पोलिसांना बंदपत्रात लिहून दिले. त्यानंतरच,आ.टी. राजा सिंह हे सायंकाळी ७च्या सुमारास परत परतवाड्याकडे रवाना झाले. दरम्यान, परतवाडा येथे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशान्वये तेथे अतिरिक्त पोलीस कुमक देण्यात करण्यात आली आहे. ठाकूर यांचा इशारा आमदार टी. राजा सिंह यांना दिवसा येथे स्थानबद्ध करण्यात येणार होते. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती पोलीस अधीक्षकांना फोन करून त्यांना मार्ग मोकळा करून दिला. परंतु जिल्ह्यातील वातावरणात दूषित झाल्यास किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडला सर्वस्वी जबाबदारी ही पोलिसांची राहील, असा इशारा काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आमदार टी राजा सिंह यांना तिवसा येथे डिटेन केले होते. प्रतिबंधात्मक कारवाई करून परतवाडा येथील कार्यक्रमासाठी सोडण्यात आले असे किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुना शाखा यांनी आमच्या प्रतिनिधी माहिती दिली.

Previous articleमुस्लिम बांधवांचा शेकापला दे धक्का ! शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
Next articleअजब प्रथा! हसत हसत गोविंदा खातात चाबकाचे फटके, कारण वाचून व्हाल थक्क
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here