Home रायगड मुस्लिम बांधवांचा शेकापला दे धक्का ! शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

मुस्लिम बांधवांचा शेकापला दे धक्का ! शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

38
0

आशाताई बच्छाव

1000687328.jpg

मुस्लिम बांधवांचा शेकापला दे धक्का ! शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

युवा मराठा न्यूज पोलादपूर / रायगड :- रफीक मुल्ला

तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष सध्या शिवसेनेच्या रडारवर असून बोरघर पाठोपाठ वावे मोहल्ला येथील शेकापक्ष कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहिर प्रवेश केला. या प्रवेशावेळी महाडचे आमदार भरत गोगावले यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. प्रवेशकर्त्यांनी आ. गोगावले यांना सलग चौथ्यावेळी आमदार करण्यासाठी झटणार असल्याचा शब्द दिला आहे.

पोलादपूर तालुक्यातील वावे मोहल्ल्यातील तरुणांनी शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देत आ. गोगावले यांच्या कार्यक्षमतेवर प्रभावित होत महाड विधानसभा मतदारसंघातून आ. गोगावले यांना सलग चौथ्यांदा बहुमताने विजयी करण्यासाठी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. वावे मोहल्ल्यातील युवा नेतृत्व अबरार करबेलकर व अहमद जुवले यांच्या नेतृत्वाखाली शेखसाद करबेलकर, सैफुल्ला करबेलकर, महंमद तांबे, महंमद काझी, फय्याज काझी, समीर तांबे, जाहीद काझी, अब्दुल रेहमान करबेलकर, मुफीद ओमर, आतिफ तांबे, फहद जुले, अफान मुकादम, महंमद करबेलकर आदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आ. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवनेरी निवासस्थानी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख शौकत तारलेकर, हर्षल सातपुते, संकेत म्हस्के, सुरज वाळणकर यांच्यासह सवाद-धारवली विभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here