Home रायगड सन्मित्र ट्रक वाहतूक संघ (मुरुड- अलिबाग) अध्यक्षपदी प्रशांत नाईक यांची बिनविरोध फेरनिवड

सन्मित्र ट्रक वाहतूक संघ (मुरुड- अलिबाग) अध्यक्षपदी प्रशांत नाईक यांची बिनविरोध फेरनिवड

19
0

आशाताई बच्छाव

1000687315.jpg

सन्मित्र ट्रक वाहतूक संघ (मुरुड- अलिबाग) अध्यक्षपदी प्रशांत नाईक यांची बिनविरोध फेरनिवड

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची सन्मित्र ट्रक वाहतूक संघ – (मुरुड-अलिबाग) अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाली आहे. शनिवारी झालेल्या कार्यकारणी निवडीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

गेले अनेक वर्ष त्यांनी सन्मित्र ट्रक वाहतूक संघाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे. रक्तदान शिबिर नेत्र, तपासणी शिबिर असे अनेक उपक्रम राबवून चालकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

अलिबाग येथील गुरुप्रसाद हॉटेलमधील सभागृहात सन्मित्र ट्रक वाहतूक संघाची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत सन्मित्र ट्रक वाहतूक संघाचे चालक-मालक बहुसंख्याने उपस्थित होते.

त्यात नवीन कार्यकारणी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये प्रशांत नाईक यांची अध्यक्ष म्हणून पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी नंदकुमार मयेकर (अलिबाग), रमेश गायकर (मुरुड), सेक्रेटरी पदी सुहेल कासकर, खजिनदार पदी नियाज खान, सल्लागारपदी मधु पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच सदस्य कमिटीत संदेश नाईक, सुजित नाईक, नयन गायकर, इमरान रज्जब, दीपक मयेकर, मुन्नवर खान, जावेद गोरमे, जुबेर सय्यद, शमशुद्दीन कासकर, व शपथ कमिटी सदस्य – आकाश नागोठकर, नजीर मगनाके, प्रशांत झोमराजआणि, संपर्क कमिटी सदस्य-सय्यद खान, सुयोग रोटकर. या सर्वांची निवड करण्यात आलेली आहे.

तसेच सदस्य कमिटीत संदेश नाईक, सुजित नाईक, नयन गायकर, इमरान रज्जब, दीपक मयेकर, मुन्नवर खान, जावेद गोरमे, जुबेर सय्यद, शमशुद्दीन कासकर, व शपथ कमिटी सदस्य – आकाश नागोठकर, नजीर मगनाके, प्रशांत झोमराजआणि, संपर्क कमिटी सदस्य-सय्यद खान, सुयोग रोटकर. या सर्वांची निवड करण्यात आलेली आहे.

Previous articleखरीप हंगाम ई-पिक पाहणी 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे आवाहन.
Next articleगणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा CM यांचा मानस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here