Home बीड बीड जिल्ह्याच्या कायद्यात राजकारण का? राजकारणात कायदा सुचेना!

बीड जिल्ह्याच्या कायद्यात राजकारण का? राजकारणात कायदा सुचेना!

46
0

आशाताई बच्छाव

1000686204.jpg

बीड जिल्ह्याच्या कायद्यात राजकारण का? राजकारणात कायदा सुचेना!

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि:२७- बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून सध्या बीड जिल्ह्यातीलच नव्हेत तर महाराष्ट्रातील सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ज्या घटना घडत आहेत त्याला जबाबदार कोण? महाराष्ट्रातील राजकारण, राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रातील वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण व गुन्हा करून मोकाट फिरणारे गुन्हेगार याला जबाबदार आहे. शासनातील कायद्यात काम करणारे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय पक्षातील राजकीय नेते, पुढारी आणि गुंड भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी, भ्रष्ट नेते पुढारी आणि गुंड या तिन्ही क्षेत्रातील लोकांची सांगड आणि एकमत झाल्याने आज महाराष्ट्रात अराजकता माजली असून नेमक कायद्यात राजकारण आहे का ? राजकारणात कायदा हाच सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. पुर्वीच्या काळी महाराष्ट्र शासनाचा, पोलिस खात्याचा जो दरारा दिसत होता तो आज दिसत नाही. महाराष्ट्रातील झाडू मारणाऱ्या चपराश्यापासून ते कलेक्टर पर्यंत सर्व अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्ट असल्याचे अनेक घटनांमधून आणि पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. शासन आणि प्रशासन हे सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे असले पाहिजे पोलिस प्रशासन म्हणजे सामान्य जनतेचा विश्वास आणि ताकत देशातील कायदा आणि सुव्यवस्थ राखण्यासाठी आहे परंतू आज याच पोलिस प्रशासनाकडून मोठे मोठे गुन्हे होताना दिसतात. सामान्य जनतेला वेठिस धरून राजकीय पक्षातील भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांची हुजूरी करताना महाराष्ट्र शासन आणि पोलिस खाते करत असताना दिसतात. मोठ मोठ्या गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना राजकीय पक्षातील नेत्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या एका फोनवर कोणताही गुन्हा दाखल न करता मोकाट सोडून दिले जाते. तसेच महाराष्ट्र शासनातील अधिकारी आणि कर्मचारी सामान्य जनतेला वेठीस धरून मोठ मोठ्या राजकीय नेत्यांची कामे करतात. अशा कित्येक घटना आहेत. पोलिस प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी, राजकारणातील भ्रष्ट, गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांमुळे आणि महाराष्ट्र शासनातील भ्रष्ट शासकिय कर्मचारी यांच्या सांगडीने मोठ्यात मोठ्या गुन्हे करणाऱ्यांना पाठबळ मिळते. यामुळेच आज महाराष्ट्रातील जनतेची आणि महाराष्ट्राची अशी दुर्दशा झालेली दिसते. पोलिस खात्यातील खाकी दरारा आज भ्रष्ट राजकारण्यांची आणि गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांची गुलामगिरी आणि हुजुरेगिरी करताना दिसत आहे. महाराष्ट्रातील खाकी वर्दीतला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जेव्हा खादीतील भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यांना खाकीचा हिसका दाखवणार का? असा सवाल आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता करत आहे.

Previous articleचिरनेर गावातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास ग्रामस्थांनी मानले सरपंचाचे व खारपाटील बंधूंचे आभार
Next articleनांदगाव मतदार संघातून राजेंद्र पाटील राऊत राष्ट्रीय मराठा पार्टी कडून उमेदवारी करणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here