Home रायगड चिरनेर गावातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास ग्रामस्थांनी मानले सरपंचाचे व खारपाटील बंधूंचे...

चिरनेर गावातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास ग्रामस्थांनी मानले सरपंचाचे व खारपाटील बंधूंचे आभार

29
0

आशाताई बच्छाव

1000686087.jpg

चिरनेर गावातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

 

ग्रामस्थांनी मानले सरपंचाचे व खारपाटील बंधूंचे आभार

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

चिरनेर गावातील मुख्य रस्ते हे खड्ड्यांनी व अतिक्रमणांनी व्यापले. यामुळे नागरिकांना तसेच गावात ये-जा करणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. चिरनेर गावचे विद्यमान सरपंच भास्कर मोकल यांनी चिरनेर गावातील उद्योगपती पी. पी. खारपाटील व राजाशेठ खारपाटील यांच्या तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढून काँक्रीटचे रस्ते करण्यास सुरुवात केल्याने गावातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या चिरनेर गावात पेशवेकालीन जागृत श्री महागणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. तसेच १९३० सालच्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेली शुरवीरांची भूमी आहे. त्यामुळे या गावात दरदिवशी मुंबई, नवीमुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेण सह इतर तालुक्यातील अनेक पर्यटक, भाविक हे चिरनेर गावाला आपआपल्या कुटुंबासह, मित्र मंडळींसह भेट देत असतात. मात्र, गावातील खड्डेयुक्त रस्ते, वाढते अतिक्रमण यांचा त्रास हा गावातील नागरिकांबरोबर ये-जा करणाऱ्या पर्यटक, भाविकांना सहन करावा लागत असल्याने त्याचा फटका हा गावातील छोटेमोठे व्यवसायिक, कला नगरातील कुंभार बांधवांना सहन करावा लागत असे. यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी यासाठी सातत्याने नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती.

चिरनेर गावच्या सरपंच पदी भास्कर मोकल यांची वर्णी लागताच त्यांनी गावाचा कायापालट करण्याची संकल्पना मांडली. चिरनेर गावातील उद्योगपती पी. पी. खारपाटील व राजाशेठ खारपाटील, ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन घबाडी, पोलीस पाटील संजय पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकदिलाने ‘माझं गाव आपला विकास’ या भावनेने पिढीत होऊन विद्यमान सरपंच भास्कर मोकल यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढून गावातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटच्या कामाला आपला हातभार लावत सुरुवात केली. आज चिरनेर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुभाष त्रिभुवन यांचे लोटांगण आंदोलन
Next articleबीड जिल्ह्याच्या कायद्यात राजकारण का? राजकारणात कायदा सुचेना!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here