आशाताई बच्छाव
डेंग्यूचा सं ‘ताप!’ -डेंग्यू सदृश्य तापाने घेतला साखरखेर्डात दुसरा बळी?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- साखरखेर्डा डेंग्यू सदृश्य तापामुळे या आठवड्यात एका युवतीचा मृत्यू झाला असून, आज एका युवकाचा डेंग्यू सदृश्य तापीमुळे बळी गेल्याचे बोलले जात आहे. त्याला दंश झाला परंतु हा दंश नेमका डेंग्यूच्या डासाचा होता की आणखी कुणाचा? हे सध्या कळू शकले नाही. आरोग्य विभागाच्या रिपोर्टमध्ये याचे खरे कारण समोर येईलच ! परंतु या घटनेने साखरखेर्डात खळबळ उडाली आहे. अशोक कामाजी देवकर वय ३४ असे मृत रुग्णाचे नाव आहे.
साखरखेर्डात डेंग्यूने आधीच पंख पसरविले होते. त्यामुळे परिसरात डेंग्यू सदृश्य तापेचे रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने येथे औषध फवारणी देखील केलेली आहे. साखरखेर्डा येथे तापीची साथ आहे. २३ ऑगस्ट रोजी वार्ड क्रमांक सहा मधील अशोक कामाजी देवकर याला ताप आली. त्यातच त्यांचा बीपी कमी झाला. त्याला तातडीने चिखली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला. परंतू परिस्थिती नाजूक असल्याने अशोकला बुलढाणा येथे नेले तेथे उपचार करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याला दंश झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दंश डेंग्यूच्या
डासाचा होता की आणखी काही? याची माहिती कळू शकली नाही. २१ ऑगस्ट रोजी प्रियंका समाधान नरवाडे या युवतीचा डेंग्यू सदृश्य तापेने मृत्यू झाला होता. ताप आल्यानंतर तिचाही बीपी कमी झाला होता. तीलाही छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी अशोक देवकर यांचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. परिणामी वाढता डासांचा प्रादुर्भाव पाहता डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्राम पंचायतीने योग्य उपाययोजना कराव्या अन्यथा टोकाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.