Home भंडारा साकोली विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी तर्फे तीन उमेदवार स्पर्धेत

साकोली विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी तर्फे तीन उमेदवार स्पर्धेत

450
0

आशाताई बच्छाव

1000679240.jpg

साकोली विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी तर्फे तीन उमेदवार स्पर्धेत

 

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची चुरस लागलेली आहे .प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार कोण राहतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत. प्रत्येक पक्षामध्ये रस्सीखेच आहे .एका विधानसभा क्षेत्रातून पाच पाच, सात, आठ आठ ,उमेदवार स्पर्धेमध्ये आहेत. तर साकोली विधानसभेचे क्षेत्रांमध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे तीन ते चार उमेदवार स्पर्धेत आहेत. त्यामध्ये भंडारा येथील रहिवासी डॉ. अविनाश नान्हे हे सुद्धा वंचित बहुजन आघाडी तर्फे लढण्यास इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे त्यांनी अर्ज केलेला आहे .ते व्यवसायाने डॉ. असून त्यांच्या दवाखाना भंडारा येथे आहे. त्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत .
त्यानंतर साकोली येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते ज्यांना महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे व ज्यांनी पत्रकारिता क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात 25 वर्षापासून आपला योगदान दिलेले आहेत असे डी जी रंगारी यांनी सुद्धा पक्षाकडे साकोली विधानसभा करता फॉर्म भरलेला आहे.तिसरे उमेदवार म्हणून लाखनी येथील शाहीर अंबादास यांच्या मुलगा श्रीकांत नागदेवे यांनी सुद्धा साकोली विधानसभा करिता त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. या ठिकाणी डॉ अविनाश नान्हे आहेत पाहिजे त्याप्रमानात त्यांची ओळख नाही. परंतु गेल्या एक-दोन महिन्यापासून ते आपले समाजाचे मेळावे घेऊन आपण स्पर्धेत कसे उतरू यासाठी प्रयत्न सुरू आहेत .तर श्रीकांत नागदेवे लाखनी येथील असून त्यांच्या छोट्या मोठ्या बैठका सुरू आहेत. पक्षांमध्ये ते काम करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे लाखनी तालुका ते अध्यक्ष आहेत व शाहीर अंबादास यांचे जेष्ठ चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या थोडाफार प्रभाव आहे .त्यानंतर डी जी रंगारी सर हे साकोली येथील रहिवासी असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात शिक्षक या पदावर 33 वर्ष सेवा दिलेली आहे .ते सेवानिवृत्त झाले .सेवानिवृत्त नंतर ते वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये 2022 पासून कार्यरत आहेत .ते जिल्ह्याचे जिल्हा संघटक म्हणून सध्या काम पाहत आहे .अंधश्रद्धा निर्मूलन, पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत काम केला आहे करत आहेत करत राहणार आहेत .लोकांचे प्रश्न शासकीय प्रशासकीय स्तरावर आताच नव्हे तर गेल्या 25 वर्षापासून लोकांचे काम करण्यात तरबेज आहेत सरळ प्रशासनाकडे प्रशासकीय अधिकाऱ्याकडून त्यांना घेऊन जाऊन त्यांचे काम कसे करता येईल या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत. आणि रोजच लोकांच्या प्रश्नासाठी लिखाणाच्या माध्यमातून प्रश्न सोडवत आहेत .गोर गरीब वंचित यांचे प्रयत्न पत्रकारिता त्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सतत संपर्क आहे आणि विविध प्रकारचे प्रबोधन मिळावे, प्रबोधन कार्यक्रम, बैठका लोकांची जनसंपर्क सुरू असून सध्या तरी त्यांच्या साकोली विधानसभा येथे प्रभाव आहे. तीन्ही उमेदवारास वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी तिघांचेही प्रयत्न सुरू आहेत.
परंतु शेवटी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी मधून प्रभावशाली उमेदवार म्हणून पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांच्याकडे लोक आशेने पाहत आहेत त्यांना उमेदवारी मिळावी असं लोकांची इच्छा आहे एक सुशिक्षित व समाजाची जाण असलेला प्रश्न समजून घेणारा व समजणारा व्यक्तिमत्व त्यांची सेवा पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये झालेली आहे असा उमेदवार देण्यात यावा असे साकोली विधानसभेतील लोकांच्या मत आहे शेवटी पक्षश्रेष्ठी विचार करणार आणि योग्य उमेदवार म्हणून कोणाची घोषणा होणार कोणाला तिकीट मिळणार हे परिसरात व विधानसभेत चर्चेच्या विषय आहे.

Previous articleतख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी घेतले दर्शन.
Next articleआश्रमात अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलींवर आश्रम चालक दादा महाराजांचा अत्याचार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here