आशाताई बच्छाव
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी घेतले दर्शन.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड , दि. 25 :- केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांच्या आई जसबीर कौर यांचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सचखंड गुरूद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघजी जथेदार, संत बाबा रामसिंघजी सहायक जथेदार, अधीक्षक सरदार राज देवेंद्र सिंघजी, सहायक अधिक्षक स. रविंद्रसिंघ कपूर, जयमलसिंघ ढिलो, रविंद्रसिंघ बुंगई, राजेंद्रसिंघ पुजारी, रेल्वेचे प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक बी नागया, बांधकाम मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. अग्रवाल, विभागीय क्षेत्रिय व्यवस्थापक निती सरकार, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे, आदींची उपस्थिती होती.