Home जळगाव विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करा – रयत सेनेची मागणी

विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करा – रयत सेनेची मागणी

16
0

आशाताई बच्छाव

1000675361.jpg

विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करा – रयत सेनेची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- देशात व राज्यात सध्या महिला व मुली सुरक्षित नसल्याने प्रत्येक पालकांमध्ये मुलींप्रती भिती चे वातावरण निर्माण झाले आहे .बदलापूर येथील लहान बालिकांवर झालेले लैंगिक अत्याचार हे घृणास्पद असून समाजाला काळीमा फासणारे कृत्य आहे.
वारंवार अत्याचाराच्या घडना घडत असल्यामुळे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी आत्म संरक्षणाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करा विद्यार्थिनींना सक्षम बनविण्यासाठी नारी सुरक्षा अंतर्गत आत्मनिर्भर बनण्यासाठी
कुंफू कराटे,बॉक्सिंग, (मुष्टियोद्धा)
लाठी,तलवारबाजी स्व-रक्षणार्थ
प्रशिक्षण वर्ग सुरू करावे तसेच विद्यार्थिनींचे शौचालय जेथे असतील अशा ठिकाणी महिला कर्मचारी नियुक्त करावेत
तसेच विद्यार्थिनींचा वावर जेथें जेथे असतील त्या ठिकाणी सी सी टिव्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच शाळा,महाविद्यालयाच्या आवारामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी सोडून इतर कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नयेअशी मागणी रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी चेअरमन नारायण अग्रवाल यांच्याकडे दि २४ रोजी निवेदनाद्वारे केली आहे,
निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी एन पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे अध्यक्ष खुशाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले,शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे ,शहर संघटक शिवाजी गवळी, शहर सहसंघटक दीपक देशमुख, मार्गदर्शक राजू पाटील,सुशील देशमुख, प्रकाश गवळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here